हिंदळे बौद्धवाडीतील घर कोसळले; देवगड तालुक्यात मुसळधार पावसाचा कहर

28

 

देवगड (प्रतिनिधी)

हिंदळे बौद्धवाडीतील घर कोसळले; देवगड तालुक्यात मुसळधार पावसाचा कहर

देवगड तालुक्यात गेले चार दिवसांपासून मुसळधार पावसाचा जोर कायम असून वादळी वाऱ्यासह पाऊस कोसळत आहे. सोमवारी तर या पावसाने शंभरी (१०० मि मी)पार केली.या अतिवृष्टीमुळे हिंदळे बौद्धवाडी येथे प्रतिभा प्रभाकर हिंदळेकर व सुमित्रा महादेव हिंदळेकर यांचे समाईक जुने घर जोरदार पावसामुळे पूर्णपणे कोसळले असून सुमारे पन्नास हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. सुदैवाने घरात कोणीही वास्तव्यास नसल्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही.
पावसाच्या तडाख्यामुळे परिसरात गारठा पसरला असून अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली आहेत. किरकोळ झाडांच्या पडझडीमुळे काही ठिकाणी वाहतूक अडथळा निर्माण झाला आहे. आतापर्यंतच्या हंगामात एकूण २३९७ मि.मी. पाऊस झाला आहे.हवामान खात्याने येत्या 20 ऑगस्टपर्यंत मुसळधार पावसाचा इशारा दिल्याने नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.