कुणकेश्वर ते देवगड महाविद्यालय धावण्याचा उपक्रम — Run for Ganesha

17

 

देवगड (प्रतिनिधी)

कुणकेश्वर ते देवगड महाविद्यालय धावण्याचा उपक्रम — Run for Ganesha

कोकणवासीयांचे आराध्य दैवत श्री गणेशाचे स्वागत आणि सद्भावना दिन औचित्य साधून देवगड महाविद्यालयाच्या जिमखाना व क्रीडा विभागातर्फे कुणकेश्वर ते देवगड महाविद्यालय दरम्यान धावण्याचा विशेष उपक्रम “Run for Ganesha” बुधवार, दि. 20 ऑगस्ट 2025 रोजी आयोजित करण्यात आला आहे.
ही धाव श्री क्षेत्र कुणकेश्वर मंदिर परिसरातून सकाळी 8.30 वाजता सुरू होणार असून देवगड महाविद्यालयात समारोप होईल. महाविद्यालयीन विद्यार्थी मोठ्या संख्येने या धावण्यात सहभागी होणार आहेत.
या उपक्रमाचा उद्देश केवळ शारीरिक तंदुरुस्ती वाढविणे एवढाच नसून समाजात सद्भावना, एकता आणि सकारात्मकतेचा संदेश देणे हा आहे. धावण्यादरम्यान मान्यवरांची उपस्थिती विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरणार असल्याचे महाविद्यालय प्रशासनाने सांगितले.