शिरगांवच्या कर्ले महाविद्यालयात रक्षाबंधनातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश

42

 

कणकवली (तुळशीदास कुडतरकर) 

शिरगांवच्या कर्ले महाविद्यालयात रक्षाबंधनातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश

ग्रीन क्लब विभागाने राबविला अनोखा उपक्रम
        वृक्षवल्ली आम्हा सगेसोयरे वनचरे अशी संताची शिकवण आहे. वृक्ष आपल्याला ऑक्सिजन, सावली, फुले, फळे,औषधे तसेच पाणी साठवून जमिनीचे संरक्षण यांसारख्या अमूल्य ठेवा देतात. राखी बांधून आपण त्यांना तोडणार नाही तर त्यांचे संवर्धन करू रक्षाबंधनानिमित्त झाडांना राखी बांधण्यामागे पर्यावरण संरक्षणाचा आणि निसर्गाशी नातं जोडण्याचा एक सुंदर संदेश दडलेला आहे असे मार्गदर्शन पुंडलीक अंबाजी कर्ले महाविद्यालयाच्या प्राध्यापिका सोनाली ताम्हणकर यांनी केले.
देवगड तालुक्यातील शिरगांव येथिल पुंडलिक अंबाजी कर्ले कला व वाणिज्य महाविद्यालयात शनिवारी ग्रीन क्लब विभागाअंतर्गत  महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी झाडांना राखी बांधून रक्षाबंधन अनोख्या पद्धतीने साजरे केले. यावेळी पारंपारिक रक्षाबंधनात जसं बहीण भावांमधील प्रेम, विश्वास आणि संरक्षणाचा वचन दिल जात तसंच, पर्यावरणाचा समतोल राखवण्यासाठी वृक्षाना राखी बांधून आपण त्यांचे रक्षण आणि संवर्धन करण्याची सर्वांनी शपथ घेऊया असे मार्गदर्शन ग्रीन क्लब विभाग प्रमुख प्राध्यापिका सोनाली ताम्हणकर यांनी केले यावेळी प्राचार्य समीर तारी महाविद्यालयातील विद्यार्थी उपस्थित होते.