रोटरी क्लब ऑफ मॅंगो सिटी देवगड यांच्यावतीने ११ ऑगस्ट रोजी देवगड इंद्रप्रस्थ सभागृहामध्ये नगरपंचायत कर्मचारी व महाराष्ट्र विद्युत वितरणच्या कर्मचारी व अधिकाऱ्यांसाठी मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
रोटरी क्लब ऑफ मॅंगो सिटी देवगड या संस्थेने देवगडमध्ये अनेक सामाजिक उपक्रम राबविले आहेत. अनेक रुग्णांनाही जयपूर फूटच्या माध्यमातून अपघातग्रस्त व अपंगत्व आलेल्या व्यक्तींना कृत्रिमरीत्या हात व पाय बसविण्यात आले आहेत. ११ ऑगस्ट रोजी सकाळी ९ :०० ते दुपारी २ :०० या कालावधीमध्ये देवगड नगरपंचायतमधील कर्मचारी व तालुक्यातील विद्युत कर्मचारी व अधिकाऱ्यांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन देवगड रोटरी क्लबतर्फे करण्यात आले आहे.
या शिबिरामध्ये मधुमेह तपासणी व इतर आरोग्याच्या तपासण्या करून मोफत उपचार केले जाणार आहेत. या आरोग्य शिबिरासाठी मधुमेह तज्ज्ञ डाॅ. प्रशांत मडव, डाॅ. अरुण गुमास्ते व होमिओपॅथी व आहारतज्ज्ञ डाॅ. गार्गी ओरसकर उपस्थित राहणार आहेत. मधुमेह तपासणी करणाऱ्या रुग्णांनी उपाशीपोटी यायचे आहे.अल्पोपहाराची व्यवस्था रोटरी क्लबतर्फे करण्यात आली आहे. तरी इच्छुकांनी नावनोंदणी रोटरी क्लबचे अध्यक्ष गाैरव पारकर – ९४२११४२६२६, डाॅ. रामदास बोरकर – ९४२२५८४०३८ यांच्याकडे करावी.