देवगड (प्रतिनिधी)
संगनमताने समन्वयातुन सुसंवाद साधित काम करावे – प्रा.हरीभाऊ भिसे
संघटनेमध्ये कार्यरत असलेले सदस्य हे एक विशिष्ट पदावर जरी असले तरी सर्व समान आहेत. सर्वांनी ध्येय आणि कार्य हे संघटनात्मकरित्या करायचे आहे. त्यामुळे वैयक्तिक पातळीवर जाऊन या संघटनेचा वापर तसेच ओळख पत्राचा उपयोग न करता सर्वसमावेशक काम असावे आणि सर्वांच्या एकमताने त्यावर निर्णय व्हावेत. तालुकास्तरीय कार्य कारिणीने जे निर्णय घेतले असतील ते जिल्हा पदाधिकाऱ्याना माहिती व्हावेत आणि संगनमताने समन्वयातुन सुसंवाद साधित काम करावे असे आवाहन सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष प्राध्या.हरीभाऊ भिसे यांनी देवगड येथे आयोजित केलेल्या जिल्हा व तालुका पदाधिकारी बैठकीत बोलताना केले.
या बैठकीत इंटरनॅशनल ह्यूमन राइट्स (आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटना) मार्फत देवगड येथे जिल्हास्तरीय सहविचार सभा आयोजित करण्यात आली.होती या सभेला जिल्हास्तरीय पदाधिकारी आणि तालुका पदाधिकारी उपस्थित होते. चर्चेदरम्यान ह्यूमन राइट्स संघटनेचे जिल्हा अध्यक्ष प्रा. हरिभाऊ भिसे यांचे सामाजिक सांस्कृतिक,शैक्षणिक क्षेत्रातील कार्य उल्लेखनीय कार्याबद्दल तसेच, ह्यूमन राइट्स संघटनेचे जिल्हा प्रसिद्धीप्रमुख दयानंद मांगले यांना दक्षिण भारत जैन सभेचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकार पुरस्कार प्राप्त झाल्यामुळे तसेच ह्यूमन राइट्स संघटनेच्या जिल्हा ज्येष्ठ नागरिक सचिव सौ रिमा भोसले यांचे साहित्यिक व विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल आणि मराठी साहित्य विषयक दिशादर्शक लेखन विचारात घेऊन या तिन्ही पदाधिकारी यांचा ह्यूमन राइट्स या संघटनेच्या वतीने सन्मानचिन्ह,शाल,श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन देवगड येथे सत्कार करण्यात आला.
या संघटनेमध्ये कार्यरत असलेले सदस्य हे विविध क्षेत्रातून सेवानिवृत्त होऊन तसेच अनुभव संपन्न असे असल्यामुळे त्याचा फायदा संघटना वाढीसाठी अधिक चांगल्या प्रकारे होऊ शकेल. देवगड येथील ह्यूमन राइट्स संघटनेचे कार्य उल्लेखनीय आहे.असेही या बैठकीत विचार व्यक्त करण्यात आले.या बैठकीला जिल्हा उपाध्यक्ष दयानंद तेली,महिला जिल्हा अध्यक्ष सुरेखा भिसे,रीमा भोसले,जिल्हा कार्याध्यक्ष दीपिका मेस्त्री मेस्त्री जिल्हा सरचिटणीस शरयू ठुकरुल ,उपाध्यक्षा दीक्षा तेली जिल्हा प्रसिद्धी प्रमुख दयानंद मांगले राज्य पोलिस प्रोटेक्शन प्रमुख विजय कदम , जिल्हा कार्याध्यक्ष सुनील मेस्त्री,तालुका सरचिटनिस गिरीश धोपटे,राजन भोसले,रंजन चव्हाण ,आनंद देवगडकर सदस्य,भाई बांदेकर ,श्याम कदम, सरपंच दिपाली मेस्त्री,शिवानी भिडे, पूजा जाधव,दिक्षा तेली राष्ट्रीय अध्यक्षा प्रविणा कडू यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा अध्यक्ष प्रा. भिसे यांच्या नेतृत्वाखाली ही संघटना आणि संघटनेचे कार्य वाढीस लागेल असा विश्वास व्यक्त केला.





