मुंबई विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या विद्यमाने ११ ऑगष्ट रोजी देवगड तालुक्यातील पुंडलीक अंबाजी कर्ले कला व वाणिज्य महाविद्यालयात वार्षिक कार्यक्रम व प्रकल्प नियोजन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.
या एक दिवशीय कार्यशाळेत मुंबई विद्यापिठाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक सुशील शिंदे राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी रमेश देवकर मुंबई उपनगर जिल्हा समन्वयक निखिल कारखानीस सिंधुदुर्ग जिल्हा समन्वयक वसिम सय्यद आदी मान्यवर उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. कार्यशाळेस सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी यांनी उपस्थित रहावे असे आवाहन कर्ले महाविद्यालयाचे प्राचार्य समिर तारी कार्यक्रम अधिकारी प्राध्यापिका कोमल पाटील यांनी केले आहे.