तालुकास्तरीय विज्ञान नाटय स्पर्धेत देवगड हायस्कूलचा व्दितीय क्रमांक

25

 

देवगड (प्रतिनिधी)

तालुकास्तरीय विज्ञान नाटय स्पर्धेत देवगड हायस्कूलचा व्दितीय क्रमांक

महात्मा गांधी विद्यामंदिर तळेबाजार येथे संपन्न झालेल्या तालुकास्तरीय विज्ञान नाट्य व वक्तृत्व स्पर्धेत शेठ म. ग. हायस्कूल देवगडच्या ‘ स्व स्वच्छतेचा ‘ या विज्ञान एकांकिकेला व्दितीय क्रमांक प्राप्त झाला तर विज्ञान वक्तृत्व स्पर्धेत स्नेहा नागरगोजे हीने व्दितीय क्रमांक मिळविला.
या एकांकिके मध्ये ओवी बापट , पूर्वी कोयंडे , अनन्या कुंभरे, स्वरा भिडे, अधिराज बलवान, ध्रव दाभोळकर , हर्ष मिराशी, सम्यक सकपाळ, हार्मोनियम – प्राजक्ता भिडे , तबला – राज्ञी कुळकर्णी व गायक – प्रांजली कानेटकर या सर्व विद्यार्थांचा सहभाग होता. या ऐकांकीसाठी विज्ञान शिक्षक स्वरा कोयंडे , सागर कर्णिक, शिवाजी ढाकणे व आरती लोके यांनी विशेष मेहनत घेतली .
या सर्व सहभागी विद्यार्थ्यांचे संस्थाचालक , पालक, मुख्याध्यापक प्रविण खडपकर पर्यवेक्षिका सौ निशा दहिबावकर , शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.