वैभववाडी (प्रतिनिधी)
करूळ घाटात आयशर टेम्पो पलटी : दोघेजन जखमी
दाट धुक्याचा चालकाला अंदाज न
आल्याने आयशर टेम्पो करुळ घाटात पलटी झाला. अपघातग्रस्त टेम्पोचा दर्शनी भाग दरीत झुकला. केवळ दैव बलवत्तर म्हणूनच चालक आणि क्लीनर बचावले आहेत. दोन्हीही किरकोळ जखमी झाले आहेत. हा अपघात बुधवारी रात्री 9 वाजता झाला. पोलिसांना माहिती मिळताच पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले.
बुधवारी करूळ घाटात दाट धुके पडले होते. दरम्यान कोल्हापूरहून सावंतवाडीकडे सिमेंटचे पत्रे भरलेला आयशर टेम्पो (नं. एमएच ०९- ४२७४) घेऊन चालक अभिजीत कांबळे जात होते. करूळ घाटातील धोकादायक वळणावर दाट धुक्याचा चालकाला अंदाज आला नाही. त्याने ब्रेक मारताच टेम्पो पलटी झाला.
सदर टेम्पो हा गॅबियन भिंतीवर जोरदार आढळला. भिंतीचा काही भाग दरीत कोसळला आहे. व सिमेंटचे पत्रे देखील दरीत कोसळले आहेत. टेम्पोचा काही भाग भिंतीच्या पुढे झुकला आहे. या अपघातग्रस्त टेम्पोतून चालक क्लीनर मोठ्या शीताफिने बाहेर पडले. चालक किरकोळ जखमी झाला आहे. त्याच्यावर गगनबावडा येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहे.





