विशाखा साटम भारतरत्न डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम राष्ट्रीय समाजरत्न आदर्श प्राध्यापिका पुरस्काराने सन्मानित

125

 

देवगड (प्रतिनिधी)

विशाखा साटम भारतरत्न डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम राष्ट्रीय समाजरत्न आदर्श प्राध्यापिका पुरस्काराने सन्मानित

देवगड तालुक्यातील शिरगांव बाजारपेठ येथिल स्काय एज्युकेशन कोचिंग क्लासेसच्या प्राध्यापिका विशाखा साटम यांना ए.डी.फाउंडेशन महाराष्ट्र राज्य या संस्थेच्या भारतरत्न डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम राष्ट्रीय समाजरत्न आदर्श प्राध्यापिका पुरस्कार २०२५ ने पूणे येथे गौरावण्यात आले.
पुणे पिंपरी-चिंचवड येथील ग. दि .माडगूळकर नाट्यगृहात २६ जुलै रोजी ए.डी.फाउंडेशन महाराष्ट्र राज्य या संस्थेचा भारतरत्न डॉ.ए.पी.जे अब्दुल कलाम जीवन समाजरत्न पुरस्कार वितरण सोहळा पार पडला सोहळ्यात प्राध्यापिका विशाखा साटम यांना शाल, सन्मानपत्र, गौरवचिन्ह देऊन गौरवण्यात आले.
सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून ए. डी. फाउंडेशनचे अध्यक्ष अशोक गोराड, संत बागडे बाबा आश्रमाचे मठाधिपती तुकारामबाबा महाराज, पुणे महानगर पालीकेचे सहाय्यक आयुक्त वैशाली मार्तंड-चव्हाण , अतिरिक्त पोलीस आयुक्त श्रीराम मांडरके, रील स्टार प्राजक्ता मांजुलकर, आंतराष्ट्रीय मॉडेल श्वेता परदेशी, मिस इंडिया ममता भोई आदी मान्यवर उपस्थित होते.
गेल्या ९ वर्षापासून विशाखा साटम या शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत आहेत.स्काय एज्युकेशन कोचिंग क्लासेसच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्वक मार्गदर्शन करत असून त्यांच्या यशस्वी भविष्यासाठी या सातत्याने प्रयत्नशील आहेत.आजवर विविध महाविद्यालये, युनिव्हर्सिटी इतर संस्था व फाउंडेशनच्या माध्यमातून त्यांच्या कार्याची दखल घेण्यात आली आहे. ३५० हून अधिक प्रशस्तीपत्रे, सन्मानचिन्हे, गौरवपत्रे देऊन त्यांच्या शिक्षण क्षेत्रातील योगदानाचा वेळोवेळी गौरव झाला आहे. शिक्षण क्षेत्रातील योगदानाबद्दल ए.डी फांऊंडेशने केलेल्या सन्मानाबद्दल त्यांचे सर्वच स्तरातून अभिनंदन होत आहे.