स्वच्छ ग्रामस्पधेत बापर्डे ग्रामपंचायत विभागात प्रथम ; पनवेल येथे १२ ऑगस्टला होणार पुरस्कार वितरण
संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान अंतर्गत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पधेत बापर्डे ग्रामपंचायत सन २०१९- २० मध्ये विभागात प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे . बापर्डे ग्रामपंचायतीने आतापर्यत विविध अभियानात यश मिळवले आहे . निर्मल ग्राम पुरस्कार , स्मार्ट ग्राम पुरस्कार , असे विविध पुरस्कार ISO मानांकन प्राप्त बापर्डे गावाने स्वच्छतेमध्ये सातत्यपुर्ण व नाविन्यपुर्ण उपक्रम राबविलेले आहेत . या उपक्रमाची पाहणी करण्यासाठी आता पर्यत राज्यातीत जिल्हा परिषद , पंचायत समिती , ग्रामपंचायतींनी भेटी दिलेल्या आहेत .
या यशात सर्वांचे सांघिक प्रयत्न महत्वाचे असल्याचे प्रतिपादन बापर्डे सरपंच श्री .संजय लाड यांनी व्यक्त केले . या यशाबद्दल गटविकास अधिकारी देवगड श्री. अरूण चव्हाण यांनी बापर्डे गावाच अभिनंदन केल .विभागात प्रथम क्रमांक प्राप्त बापर्डेस पुरस्कार सन्मान विभागीय आयुक्त कोकण विभाग , कोकण आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली दि .१२ ऑगस्ट २०२५ रोजी ११ वा . आदयक्रांति वीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह पनवेल येथे होणार आहे .