Home महाराष्ट्र देवगड कुणकेश्वर शिवतीर्थावर नागपंचमीच्या दिवशी प्रत्यक्ष नागराजाचे दर्शन; जागृत तीर्थस्थान असल्याची वारंवार येतेय...

कुणकेश्वर शिवतीर्थावर नागपंचमीच्या दिवशी प्रत्यक्ष नागराजाचे दर्शन; जागृत तीर्थस्थान असल्याची वारंवार येतेय अनुभूती

1417

 

देवगड (प्रतिनिधी)

कुणकेश्वर शिवतीर्थावर नागपंचमीच्या दिवशी प्रत्यक्ष नागराजाचे दर्शन ; जागृत तीर्थस्थान असल्याची वारंवार  येतेय अनुभूती

दक्षिण कोकणातील प्रमुख तीर्थक्षेत्र म्हणून ओळख असलेल्या कुणकेश्वर शिवमंदिरात नागपंचमीच्या निमित्ताने आज एक दुर्मिळ आणि धार्मिकदृष्ट्या महत्त्वाचा प्रसंग घडून आला. दुपारी बारा वाजता मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या डाव्या बाजूस, लक्ष्मी खानावळजवळ नागराजाने प्रत्यक्ष दर्शन दिले.

 

सागर कोयंडे यांनी प्रथम या नागराजाला पाहिले. त्यानंतर परिसरात ही माहिती पसरताच अनेक ग्रामस्थ पाहण्यासाठी  तेथे दाखल झाले. चारचाकी वाहनासमोर नागराजा काही वेळ स्थिर होता. सुमारे दहा ते पंधरा मिनिटांनंतर तो मार्गस्थ झाला.

 

नागपंचमी हा सर्पपूजेचा विशेष दिवस. या दिवशी प्रत्यक्ष नागदेवतेचे दर्शन होणे हे केवळ भक्तिभाव नव्हे तर अध्यात्मिकदृष्ट्याही मोठे महत्त्वाचे मानले जाते. आजच्या घटनेमुळे कुणकेश्वर हे जागृत तीर्थस्थान असल्याचा अनुभव पुन्हा एकदा येथील ग्रामस्थांना आला.