करुळ येथे कृषिकन्यांनी भरवले जनावरांचे लसीकरण शिबिर

12

 

वैभववाडी (प्रतिनिधी )

 

करुळ येथे कृषिकन्यांनी भरवले जनावरांचे लसीकरण शिबिर 

डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि
विद्यापीठ, दापोली संलग्न श्री. अनगरसिद्ध शिक्षण प्रसारक मंडळ, संचलित कृषि महाविद्यालय, सांगुळवाडी येथील कृषि पदवीच्या अंतिम वर्षातील कृषिकन्यांच्या मार्फत करुळ येथील भोयटेवाडीत जनावरांचे लसीकरण शिबिर भरवण्यात आले. ग्रामीण कृषि जनजागृती व कृषि औद्योगिक कार्यानुभव कार्यक्रमाअंतर्गत हे शिबिर घेण्यात आले. या कृषिकन्या कु. तेजल मोहिते कु. पर्णवी पाटील, कु. वैभवी शेळके, कु. अनुजा कवडे व कु. अक्षता खाडये यांनी सक्रियकृषिकन्या कु. तेजल मोहिते, कु. पर्णवी पाटील, कु. वैभवी शेळके, कु. अनुजा कवडे व कु. अक्षता खाडये यांनी सक्रिय सहभाग घेतला.
          या शिबिरामध्ये पशुवैद्यकीय कृत्रिम रेतन सेवादाते डॉ. प्रथमेश गजानन पाटील यांनी आपला सहभाग दाखवून लंपी या त्वचारोगावर लसीकरण केले. पावसाळ्यात जनावरांना विविध रोगांची लागन होते; त्यादरम्यान जनावरांची कशी काळजी घ्यावी व रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये या विषयी शेतकरांना मार्गदर्शन केले. शिबिर यशस्वी होण्यासाठी गावचे सरपंच नरेंद्र कोलते व ग्रामस्थांचे तसेच शेतकऱ्यांचे सहकार्य लाभले. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. स्वप्निल होळकर, उप प्राचार्य गायकवाड सर, कार्यक्रम अधिकारी प्रा. मेस्त्री मॅडम, प्रा. कदम सर, विषय तज्ञ मा. प्रा. अंकिता वेताळे यांचे मार्गदर्शन लाभले.