कणकवली (प्रतिनिधी)
कणकवली तालुका शिवसेनेच्या वतीने पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसा निमित्त स्वयंभू मंदिरात अभिषेक ; उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांना फळे व बिस्कीट केले वाटप
कणकवली तालुका ठाकरे शिवसेनेच्या वतीने महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, पक्षप्रमुख मा. उद्धवजी ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त कणकवलीचे आराध्य दैवत स्वयंभू चरणी शिव महीन्म: अभिषेक करण्यात आला. साहेबांना उदंड व निरोगी आयुष्य लाभुदे अशी प्रार्थना करण्यात आली पुन्हा मुख्यमंत्री होउदे, शिवसैनिकांनी केली स्वयंभू चरणी प्रार्थना. यावेळी कणकवली उपजिल्हा रुग्णायलातील रुग्णांना फळे व बिस्कीट वाटप करण्यात आली.
यावेळी जिल्हाप्रमुख संदेश पारकर, विधानसभा प्रमुख सतीश सावंत, युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, यांच्यासह शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.





