प्रत्येक गावातील दिव्यांग बांधव हा सक्षम बनला पाहिजे यासाठी शिंगाडेंची धडपड – संतोष किंजवडेकर

38

 

देवगड (प्रतिनिधी)

प्रत्येक गावातील दिव्यांग बांधव हा सक्षम बनला पाहिजे यासाठी शिंगाडेंची धडपड – संतोष किंजवडेकर

तळेबाजार महात्मा गांधी विद्यामंदिर हायस्कूलमध्ये आयोजित दिव्यांग बांधवांच्या मेळाव्यास उस्फूर्त प्रतिसाद
दिव्यांगांना दरमहा २५०० रु.अनुदान केल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे समस्त दिव्यांग बांधवांच्या वतीने आभार -अनिल शिंगाडे
देवगड तालुक्यातील तळवडे, गढीताम्हाणे, रहाटेश्वर,पावणाई,वानिवडे,दाभोळे,वरेरी,,चांदोशी, किंजवडे, टेंबवली, लिंगडाळ या हद्दीतील दिव्यांग बांधवांचा
दिव्यांग बांधवांना समाजातील मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासनाच्या विविध योजना या बांधवांपर्यंत पोहोचण्याकरीता सिंधुदुर्ग साईकृपा अपंग शक्ती बहुउद्देशीय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अनिल शिंगाडेचे कार्य उल्लेखनीय आहे . आज प्रत्येक गावातील दिव्यांग बांधव हा सक्षम बनला पाहिजे यासाठीची त्यांची धडपड पाहून त्यांचे कौतुक कराव तेवढ थोड , असे उद्गगार शुभारंभ प्रसंगी किंजवडे सरपंच संतोष किंजवडेकर यांनी काढले .

सिंधुदुर्ग साईकृपा अपंगशक्ती बहुउद्देशिय शिक्षण संस्था कसाल सिंधुदुर्ग व जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमानाने देवगड तालुक्यातील महात्मा गांधी विद्यामंदिर तळेबाजार दिव्यांग बांधवांचा विभागीय मेळावा संपन्न झाला. यावेळी किंजवडे सरपंच संतोष किंजवडेकर, तळवडे माजी सरपंच प्रिया गोलटकर , चांदोशी सरपंच मेस्त्री मॅडम , महात्मा गांधी विद्यामंदिरचे मुख्याध्यापक, कर्मचारी खरात, व वरक सर, प्रवीण मोरे, प्रशांत पुरळकर मान्यवर म्हणून उपस्थित होते. सर्व मान्यवरांनी शुभेच्छा व मनोगत व्यक्त केले.

या मेळाव्यामध्ये सभासद नोंदणी , ऑनलाईन प्रमाणपत्र, रेल्वेपास, पेन्शन योजना, स्वावलंबन कार्ड, शिलाई मशीन, बालसंगोपन ,घरघंटी घरकुल आदी योजनांची माहिती दिली . तसेच गरजू साहित्याची पण नोंदणी केली .तसेच कमी दृष्टि, पॅरालीसीस, अपघात यामुळे आलेल्या दिव्यांगाची नोंदणी करण्यात आली . तसेच उपस्थित दिव्यांगांना संस्थेच्या वतीने भेटवस्तू देण्यात आली. शालेय विद्यार्थ्यानीला शालेय किट देण्यात आले.तसेच सर्व दिव्यांगांची अल्पोपाहाराची व्यवस्था संस्थेच्या वतीने करण्यात आली.सदर मेळावा यशस्वी करण्यासाठी साईकृपा संस्थेचे कर्मचारी संजना गावडे , विशाखा कासले , हर्षद खरात, सिद्धेश माळकर यांनी विशेष प्रयत्न केले .