आजगाव येथे दोन एसटीची समोरासमोर धडक ; २५ हून अधिक प्रवासी झालेत जखमी

1344

 

सावंतवाडी (प्रतिनिधी)

आजगाव येथे दोन एसटीची समोरासमोर धडक ; २५ हून अधिक प्रवासी झालेत जखमी

आजगाव येथे वेंगुर्ला-पणजी व सावंतवाडी-वेंगुर्ला बसची समोरासमोर धडक होऊन अपघात झाला. यात दोन्ही बसच्या चालकांसह २५ हून अधिक प्रवासी जखमी झालेत.जखमींना स्थानिकांच्या मदतीने उपचारासाठी मळेवाड आरोग्य केंद्रात तसेच शिरोडा ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले आहे. हा अपघात आज दुपारी ३.३० च्या सुमारास आजगाव डीएड कॉलेजलगत वळणावर झाला. अपघातानंतर स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेत मदत कार्य केले.

 

 

स्थानिकांच्या मदतीने जखमींना रुग्णालयात केले दाखल
सावंतवाडी आजगाव वाघबीळ नजीक दोन एस टी मध्ये भीषण अपघात झाला यातील जखमीना उद्योजक पराग शिरोडकर यांनी मळेवाड प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी घेऊन आले. तर काही जखमींना शिरोडा उपजिल्हा रुग्णालयात देण्यात आले आहे.
यावेळी स्थानिक कार्यकर्ते अमित प्रभू, सचिन प्रभू, संतोष रेवाडकर, अशोक रेवाडकर, गणेश रेवाडकर, आनंद कळसुलकर, शुभम परब, सूर्या पांढरे, सुनील आजगावकर यांच्यासह ग्रामस्थांनी मदत कार्यात सहभाग घेतला. मुसळधार पाऊस असल्याने मदत कार्यात मोठी अडचण येत होती.उशिरा पर्यंत घटनास्थळी कोणीही एसटीचे अधिकारी अथवा पोलीस दाखल झाले नव्हते. सावंतवाडी शिरोडा एस टी वरील चालक एस एम दर्शन व वाहक आर एस कांबळी,वेंगुर्ले पणजी गाडीवरील चालक एम के दाभोलकर, वाहक पी एस जाधव, प्रवासी दशरथ सीताराम राऊळ (वय,75 रा. सातार्डा), सुमित्रा दशरथ राऊळ (वय 68, रा. सातार्डा) अशी जखमींची नावे असून अजूनही काही जण जखमी असून त्यांची नावे मिळू शकलेली नाहीत.