देवगड (प्रतिनिधी)
देवगड मेडिकल फाउंडेशनच्या वतीने भव्य आरोग्य शिबिर यशस्वी
देवगड मेडिकल फाउंडेशनच्या वतीने शनिवार, १९ जुलै २०२५ रोजी रामेश्वर ग्रामपंचायत सभागृहात मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे भव्य आयोजन करण्यात आले. या शिबिराला परिसरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून ८० हून अधिक रुग्णांनी आरोग्य तपासणीचा लाभ घेतला.
या शिबिरात डॉ. रिया जैन आठवले, डॉ. सुनील आठवले यांच्यासह नॅब आय हॉस्पिटल, देवगड येथील तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली विविध आजारांची तपासणी करण्यात आली. शिबिरात सहभागी रुग्णांची सर्वसमावेशक तपासणी करून आवश्यक सल्ला व उपचार देण्यात आले.
शिबिरात खालील मोफत निदान चाचण्या करण्यात आल्या यामध्ये हाडांची घनता तपासणी (BMD), फुप्फुस कार्यक्षमता चाचणी (PFT),ईसीजी (ECG),
फिजिओथेरपी सल्ला, डोळ्यांची मशीनद्वारे तपासणी,रक्तातील साखर तपासणी (BSL-R)
तसेच नॅब आय हॉस्पिटल, देवगड यांच्या तज्ज्ञांनी मोतिबिंदू आणि डोळ्यांच्या इतर आजारांची तपासणी करून रुग्णांना मार्गदर्शन केले.
शिबिराचे सुरळीत आयोजन करण्यासाठी देवगड मेडिकल फाउंडेशनचे कर्मचारी दशरथ हक्के, शकूर पीरखान, प्रसाद कदम, प्रसाद मेस्त्री, अक्षता नागवेकर, भूमिका परब, शेफाली भागवत, सुमेधा पालकर व राकेश कोयंडे यांनी परिश्रम घेतले.





