देवगड / प्रतिनिधी
देवगड सातपायरी येथील विवाहितेचा शारीरिक मानसिक छळ केल्याप्रकरणी संशयित असलेले सासू सासरे यांना जिल्हा न्यायालयाने केला जमीन मंजूर
चार तोळे सोने व मोटरसायकलच्या मागणीसाठी देवगड-सातपायरी येथील सौ. साक्षी सागर अनभवणे या विवाहितेचा मानसिक व शारीरिक छळ केल्याप्रकरणी तिचे सासरे रामदास अनंत अनभवणे (६१), सासू रोहिणी रामदास अनभवणे (६२) या संशयितांना जिल्हा सत्र न्यायालयाने प्रत्येकी ५० हजाराचा सशर्त जामीन शुक्रवारी मंजूर केला आहे. संशयितांच्यावतीने अॅड. अविनाश माणगांवकर, अॅड. सिद्धेश माणगांवकर व अॅड. सौ. श्रुती सिद्धेश माणगांवकर यांनी काम पाहिले.





