हिंदळे भंडारवाडी येथील बेपत्ता अरुण  सावंत यांचा मृतदेह गुरुवारी सायंकाळी आढळला ‘भवानीचे कड’ या खडकाळ भागात

135

देवगड / प्रतिनिधी

हिंदळे भंडारवाडी येथील बेपत्ता अरुण  सावंत यांचा मृतदेह गुरुवारी सायंकाळी आढळला ‘भवानीचे कड’ या खडकाळ भागात

हिंदळे भंडारवाडी येथील बेपत्ता अरुण साबाजी सावंत (वय ५७) यांचा मृतदेह गुरुवारी सायंकाळी ४.३० वा. च्या सुमारास हिंदळे गावातील ‘भवानीचे कड’ या भागातील समुद्र किनारी खडकात कुजलेल्या स्थितीत आढळून आला. या घटनेची नोंद देवगड पोलीस स्थानकात आकस्मिक मृत्यू अशी करण्यात आली आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अरुण सावंत हे २३ मे रोजी सायंकाळी ४.३० वा. च्या सुमारास पत्नीला आपण ‘हिंदळे सडेवाडी येथील आप्पा रामचंद्र सडेकर हे मयत झाल्याने त्यांच्या कुटुंबाचे सांत्वन करण्यासाठी जातो’ असे सांगून घरातून निघून गेले होते. ते उशिरापर्यंत घरी न परतल्याने त्यांचा शोध घेण्यात आला.

मात्र, ते न सापडल्याने ते बेपत्ता असल्याची फिर्याद त्यांचा मुलगा नितीन सावंत याने पोलीस स्थानकात दिली होती. दरम्यान, गुरुवारी सायंकाळी ४.३० वा. च्या सुमारास त्यांचा मृतदेह गावातील ‘भवानीचे कड’ या भागातील समुद्रकिनारी कुजलेल्या स्थितीत आढळून आला. घटनेची फिर्याद नितीन सावंत यांनी देवगड पोलीस स्थानकात दिली. घटनेचा तपास पोलीस उपनिरीक्षक महेश देसाई करीत आहेत.