वैभववाडी ( प्रतिनिधी)
श्री देवी भैरीभवानी मंदिर माळवाडी ,आचिर्णे ३ रा वर्धापन दिन ६ मे रोजी तर देवीचा वार्षिक गोंधळ ९ मे २०२५ रोजी
वैभववाडी तालुक्यातील आचिर्णे माळवाडी येथिल भैरी भवानी मंदिर येथे मंगळवार ६ मे २०२५ रोजी ३ रा वर्धापन दिन व दिनांक ९ मे २०२५ रोजी देवीचा वार्षिक गोंधळ आयोजीत करण्यात आलेला आहे . ६ मे २०२५ रोजी ११:०० वाजता सत्यनारायण महापुजा व विविध सांस्कृतीक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे . तसेच माहिलांसाठी हळदिकुंकुचा कार्यक्रम देखिल ठेवण्यात आलेला आहे तरी या सोहळ्याचा सर्वांनी लाभ घेण्याचे आवाहन रावराणे कुटुंबियांनी व माळवाडी वासियांनी केले आहे .

माळवाडीतील गावकरी आणि रावराणे कुटुंबिय एकत्रित मिळून आपला वर्धापन दिन व गोंधळ उत्साहाने साजरा करतात सर्व या उत्सवाच्या निमित्ताने भाउबंद एकदिलाने एकत्र येऊन या कार्यक्रमात सहभागी होतात .





