ड्रग्स विरोधी मोहीम अंतर्गत मळगाव गावात प्रभात फेरीचे आयोजन करत घेतली ड्रग्स विरोधी शपथ

10

 

सावंतवाडी (प्रतिनिधी)

 ड्रग्स विरोधी मोहीम अंतर्गत मळगाव गावात प्रभात फेरीचे आयोजन करत घेतली ड्रग्स विरोधी शपथ

सिंधुदुर्ग जिल्हा पोलीसांच्या वतीने चालू असलेल्या ड्रग्स विरोधी मोहीम अंतर्गत मळगाव गावात प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले. या प्रभात फेरीसाठी नागरिक व विद्यार्थी हजर होते. प्रभात फेरी झाल्यानंतर ड्रग्स विरोधी शपथ घेण्यात आली.

सावंतवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक प्रमोद पाटील यांनी मळगाव येथील नागरिकांना ड्रग्स विरोधी महिमेसंदर्भात मार्गदर्शन व अमली पदार्थ समूळ उच्चाटनासाठी सहकार्याचे आवाहन केले.यावेळी हनुमंत पेडणेकर, तसेच गावातील इतर ग्रामस्थ शालेय विद्यार्थी आदि उपस्थित होते.