देवगड (प्रतिनिधी)
देवगड सकल हिंदू समाजाच्या वतीने पहलगाम हल्ल्यातील मृत पर्यटकांना श्रद्धांजली व भ्याड हल्लाचा तीव्र निषेध
काश्मीर खोऱ्यातील पहलगाम येथे निरपराध २८ पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्लाचा तीव्र निषेध करण्यासाठी व त्या भ्याड हल्लात बळी पडलेल्या निरपराध भारतीयांना (हिंदू) देवगड तालुक्यातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघ,सकल हिंदू समाज यांच्या वतीने जामसंडे येथील राष्ट्रीय संस्कार संवर्धन मंडळाच्या पटांगणावर श्रद्धांजली वाहण्यात आली.तसेच भ्याड अतिरेकी हल्ला करणाऱ्या इस्लामिक आतंकवाद्यांचा तीव्र शब्दात निषेध करण्यात आला.
यावेळी माजी आमदार अँड अजित गोगटे, भाजप तालुकाध्यक्ष सदाशिव उर्फ राजा भुजबळ,नगरसेवक शरद ठुकरूल, उल्हास मणचेकर,योगेश चांदोस्कर, बाळा खडपे,रविंद चिंदरकर, मिलिंद कुबल,सुनील बापट,महेश कानिटकर, ओंकार देवधर,शैलेश खाडिलकर, जगदीश गोगटे,सागर दळी,रणजीत हिर्लेकर,अँड अभिषेक गोगटे,राहुल गोगटे,भाई बांदकर,डॉ यश वेलणकर, दत्ताराम घाडी,मधुसूदन फाटक,कौस्तुभ खाडिलकर,सौ स्पृहा गोगटे,अक्षता घाडी,अजित टाककर, योगेश घाडी व अन्य हिंदू समाज बांधव उपस्थित होते .





