माझी वसुंधरा अभियान ४.० व संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान मधील उल्लेखनीय यशाबद्दल किंजवडे ग्रामपंचायतीचा मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या हस्ते विशेष सन्मान
माझी वसुंधरा अभियान ४.० व संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान मधील उल्लेखनीय यशाबद्दल किंजवडे ग्रामपंचायतीचा मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या हस्ते विशेष सन्मान
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यात वसलेले किंजवडे हे गाव विविध अभियानातील उल्लेखनीय कामगिरीमुळे नावलौकिक मिळवत आहे.माझी वसुंधरा अभियान ४.० व संत गाडगेबाबा ग्रामस्वछता अभियान जिल्हा मध्ये प्रथम क्रमांक व किंजवडे ग्रामपंचायतीने कोकण विभागात द्वितीय क्रमांक मिळवला आहे.तसेच संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान २०२३/२४ अंतर्गत जिल्हा स्तरावर यश मिळवले आहे. दिनांक २४ एप्रिल २०२५ रोजी राष्ट्रीय पंचायत राज दिनाचे औचित्य साधून छत्रपती शिवाजी महाराज सभागृह,जिल्हा परिषद,सिंधुदुर्ग येथे पुरस्कार प्राप्त ग्रामपंचायतींचे पारितोषिक वितरित करण्यात आले.किंजवडे गावचे सरपंच श्री.संतोष किंजवडेकर आणि ग्रामपंचायत अधिकारी श्री.शिवराज राठोड यांचा भेटवस्तु,प्रमाणपत्र देऊन सीईओ श्री.खेबूडकर यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.माझी वसुंधरा अभियानात कोकण विभागात यश मिळवणारी किंजवडे ग्रामपंचायत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकमेव ग्रामपंचायत आहे.
या कार्यक्रमासाठी श्री.किशोर काळे, श्रीम. राजश्री पाटील,श्रीम.सई धुरी यांच्यासह विविध मान्यवर अधीकारी उपस्थित होते.किंजवडे ग्रामपंचायतीने मिळवलेल्या या यशाबद्दल सरपंच किंजवडेकर यांनी समाधान व्यक्त करून सर्व ग्रामस्थांनी केलेल्या सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे.