खासदार नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त कणकवली ते कुणकेश्वर पदयात्रेचे आयोजन

34
Oplus_16908288

 

कणकवली (प्रतिनिधी)

खासदार नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त कणकवली ते कुणकेश्वर पदयात्रेचे आयोजन

खासदार तथा माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त’ द पॉवर हाऊस जिम यांच्या संकल्पनेतून व माजी नगराध्यक्ष समीर जी नलावडे यांच्या सहकार्यातुन कणकवली ते कुणकेश्वर पदयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.

खासदार नारायण राणे यांनी जिल्ह्याचा केलेला विकास आणि कोकणच्या समृद्धी साठी केलेली कामे हे नेहमीच सिंधुदुर्ग वासियांना अभिमानास्पद आहे त्यामुळेच त्यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त १० एप्रिलला सकाळी ५.०० वाजता कणकवली भालचंद्र महाराज मठ येथून कुणकेश्वर अशी पदयात्रा आयोजित करण्यात आली आहे.कार्यक्रमाचा शुभारंभ माजी नगराध्यक्ष समीर नलावडे याच्या हस्ते होणार आहे, कणकवली पटवर्धन चौक येथे पदयात्रेचे स्वागत सरपंच निसार शेख मित्रमंडळ यांच्या वतीने होणार आहे तसेच बेळणे खुर्द येथे सरपंच अविनाश गिरकर , नांदगाव येथे सरपंच मोरजकर , असलदे येथे पंढरी वायंगणकर, कोळोशी येथे सरपंच ईंदप, शिरगांव येथे सरपंच अमित साटम, वळिवंडे येथे नंदु देसाई, लिंंगडाळ तिठा येथे ओकांर खाजणवाडकर, तसेच लिंंगडाळ येथे संदीप साटम यांच्या तर्फे पदयात्रेचे स्वागत करण्यात येणार आहे.

कुणकेश्वर मंदिरात मध्ये नारायण राणे यांना निरोगी दीर्घायुष्य मिळण्यासाठी लघुरुद्र पूजेचे आयोजन करण्यात आले आहे .ज्यांना या पदयात्रे सहभागी व्हायचं असेल त्यांनी खालील नंबर वर संपर्क करावा असे आवाहन ‘द पॉवर हाऊस जिम’च्या वतीने करण्यात आले आहे .