राजकारणाच्या माध्यमातून प्रत्यक्षात लोकांची सेवा केली आणि यापुढेही करत राहणार – संदेश उर्फ गोट्या सावंत यांचे प्रतिपादन

25

 

कणकवली (प्रतिनिधी)

राजकारणाच्या माध्यमातून प्रत्यक्षात लोकांची सेवा केली आणि यापुढेही करत राहणार – संदेश उर्फ गोट्या सावंत यांचे प्रतिपादन

खासदार नारायण राणे यांचे विचार घेऊन जनसेवेचे व्रत असेच सुरु ठेवणार 
कणकवलीत गोट्या सावंत यांचा वाढदिवस जल्लोषात साजरा ; कार्यकर्त्यांनी केला शुभेच्छांचा वर्षाव
३५ वर्षे मी राजकारणात आहे. मात्र, कधीही राजकारण डोक्यात गेले नाही. आम्हाला नारायण राणे यांनी सांगितले की, लोकांची सेवा करा. त्यानुसार त्यांचे विचार घेऊन पुढे चाललो आहे, नारायण राणे यांनी पिचवर सांगितल्याप्रमाणे राजकारणाच्या माध्यमातून प्रत्यक्षात लोकांची सेवा केली आणि यापुढेही करत राहणार आहे.असे प्रतिपादन जि. प. माजी अध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत यांनी केले.

 

राजकारणाच्या पलिकडे येऊन आम्ही येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात एकत्र आलो. मात्र, येथून माझ्या सर्व कार्यकर्त्यांनी कोणालाही कसलीही अडचण आल्यास प्रत्येकाला मदत करण्याचे काम करायचे आहे.असे सावंत यांनी सांगितले.

 

येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात गुरुवारी रात्री संदेश उर्फ गोट्या सावंत यांचा वाढदिवस गोट्या सावंत व समीर नलावडे मित्रमंडळ आणि छ. शिवाजी महाराज चौक मित्रमंडळातर्फे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

 

यावेळी जि. प. माजी अध्यक्षा सौ. संजना सावंत, माजी नगराध्यक्ष समीर नलावडे, भाजयुमो जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री, राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष अबिद नाईक,तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री,खरेदी-विक्री संघ चेअरमन प्रकाश सावंत, जिल्हा बँक संचालक, विठ्ठल देसाई, राजन परब, नामदेव जाधव, हेमंत परुळेकर, निखील आचरेकर, अशोक राणे, शहराध्यक्ष अण्णा कोदे, अभिजीत मुसळे, वागदे सरपंच संदीप सावंत, आशिये सरपंच महेश गुरव, हेमंत परुळेकर, कलमठ उपसरपंच स्वप्नील चिंदरकर, कळसुली सरपंच सचिन पारधिये, अमय गावकर,समीर प्रभूगावकर, साकेडी उपसरपंच प्रज्वल वर्दम, लक्ष्मण घाडीगावकर, प्रदीप ढवण, संदीप जाधव, बाळा बाणे,अनिल गुरव,सचिन गुरव, सुशिल सावंत, गणेश काटकर, राजा पाटकर, राजू हिर्लेकर आदी उपस्थित होते.

 

 

यावेळी पुढे बोलताना संदेश सावंत म्हणाले, मी कट्टर राणे समर्थक असलो, तरी मुळात माझा पक्ष नारायण तातू राणे हाच आहे. त्यांच्या सोबत राहणे हे आमचे कर्तव्य आहे. मंत्री नीतेश राणे, आमदार नीलेश राणे यांची प्रामाणिकपणे आम्हा सर्वांना साथ मिळते. माझ्या राजकीय प्रवासाला नारायण राणे यांच्या माध्यमातून सुरुवात झाली. त्यावेळी मी हाफ पैंटमध्ये होतो त्यावेळी मतदानाचा हक्कही मला नव्हता. मात्र, राणेंनी सांगितल्याप्रमाणे आम्ही लोकांची सेवा केली. त्यांचे विचार घेऊन पुढे चाललो आहे.

 

समीर नलावडे म्हणाले, मी जेव्हा राणे यांच्या पक्षात प्रवेश केला, त्यावेळी मला खऱ्या अर्थाने साथ संदेश उर्फ गोट्या सावंत यांनी दिली. माझी राजकीय कारकिर्द घडण्यामागे नारायण राणे, नीतेश राणे व गोट्या सावंत यांचा मोलाचा वाटा आहे. हायस्कूल पासून राजकीय नेतृत्वाचे गुण संदेश सावंत यांच्यात होते. गोट्या सावंत यांचे नाव केवळ सिंधुदुर्ग जिल्ह्यात नव्हे, तर महाराष्ट्रातही अग्रक्रमाने घेतले जाते. आता गोट्या सावंत यांनी ५२ व्या वर्षात पदार्पण केले आहे. हे वय काहीसे उतार वयाकडे झुकणारे आहे.

 

आज तालुक्यात मोठ्या संख्येने उपसरपंच हे तरुणच आहेत. पक्षाच्या, राणेंच्या माध्यमातून तरुणांना संधी मिळत आहे. फक्त तरुणांनी पुढे जाताना राणेंचे विचार घेऊन पुढे जावे.

 

गोट्या सावंत तालुक्यात असले म्हणजे राणेंना १०० टक्के मताधिक्य मिळते, हे आता सर्वांना माहीत झाले आहे. राणेंचा बालेकिल्ला यापुढेही जपण्यासाठी आम्ही प्रयत्न करू. सूत्रसंचालन हेमंत परुळेकर यांनी केले. यावेळी कार्यकर्ते, हितचिंतक, मित्रमंडळी यांनी गोट्या सावंत यांना शुभेच्छा देण्यासाठी मोठी गर्दी केली होती.