जामसंडे भटवाडी येथील श्रीराम मंदिरात ६ व ७ एप्रिल रोजी श्रीराम जन्मोत्सव सोहळा

6

 

देवगड/ प्रतिनिधी

जामसंडे भटवाडी येथील श्रीराम मंदिरात ६ व ७ एप्रिल रोजी श्रीराम जन्मोत्सव सोहळा

 

 

जामसंडे भटवाडी येथील श्रीराम मंदिर येथे ६ व ७ एप्रिल रोजी श्रीराम जन्मोत्सव सोहळा आयोजित करण्यात आला आहे. यानिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

 

६ रोजी सकाळी ७ वा. पासून अभिषेक, विधीवत पूजा, पठण आदी धार्मिक विधी, ११ वा. विजय ग्रंथाचे वाचन, ११.१५ वा. गोवा येथील कीर्तनकार ह. भ. प. कु. अमृता अनंत करंबेळकर (संस्कृत विशारद) यांचे प्रभूरामचंद्रांच्या चरित्र्यावर सुश्राव्य कीर्तन, दुपारी १२.३० वा. श्रीराम जन्मोत्सव सोहळा, आरती, मंत्रपुष्पांजली, सायंकाळी ६ वा. नाडण येथील संगीत विशारद सौ. प्रियांका वेलणकर यांचे भजन, रात्री ८ वा. महाआरती, जप असे कार्यक्रम होणार आहेत. ७ रोजी सकाळी ७ वा. प्रभूरामचंद्रांच्या मूर्तीवर जलाभिषेक, खोतपठण व विधीवत पूजा, सायंकाळी ६ वा. कलाप्रेमी कराओके सिंगिंग क्लब, देवगड यांचा भावगीते, भक्तीगीते व मराठी, हिंदी चित्रपटसृष्टीतील गाजलेल्या सदाबहार गाण्यांची मैफिल, रात्री ८ वा. महाआरती, जप, १०.३० वा. श्रीराम भजन मंडळाचे भजन, १२ वा. लकिताचे कीर्तन सादर होणार आहे. याचा भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन रानडे परिवार व ग्रामस्थांच्यावतीने करण्यात आले आहे.