कणकवली( प्रतिनिधी)
डीपीडीसीच्या निधी खर्चात सिंधुदुर्ग राज्यात नंबर वन ; सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांची माहिती
जिल्हा प्रशासनात आर्थिक शिस्त आणण्यासाठी प्रयत्न सुरु ; सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासासाठी मी कटिबद्ध
डीपीडीसी निधी खर्चात सिंधुदुर्ग जिल्हा राज्यात ३१ मार्चपूर्वी प्रथम क्रमांकावर असून एकूण २५० कोटींपैकी ९८% निधी खर्च झाल्याची माहिती पालकमंत्री नितेश राणे यांनी कणकवली येथील पत्रकार परिषदेत दिली. जिल्हा प्रशासनात आर्थिक शिस्त आणण्यासाठी पावले उचलून जिल्हा विकासाचा निधी पूर्ण खर्चुन जिल्हा विकास करण्यासाठी मी कटिबद्ध असल्याचे पालकमंत्री पदाचा भार स्वीकारल्यानंतर सांगितले होते. मागील वर्षीचा २५० कोटींचा निधी खर्च करण्याचे नियोजन केले. सोमवारी ३१ मार्च असून आज २५० कोटीपैकी ९८% निधी खर्च झाल्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी सांगितले. राज्य पातळीवर जिल्हा नियोजन निधी खर्च बाबत राज्य सरकारच्या वेब साईट मध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या खर्चाची माहिती नमूद आहे. १८ जानेवारी पालकमंत्री तेव्हा जिल्हा निधी खर्चात ३२ व्यां क्रमांकावर होता आणि आता आपण राज्यात प्रथम क्रमांकावर असल्याची गोड बातमी गुढीपाडव्या आधी पालकमंत्री नितेश राणे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, संदीप साटम, माजी नगराध्यक्ष समीर नलावडे उपस्थित होते.





