ग्रामसेवक ज्ञानेश करंगुटकर यांचा मृत्यु ; तिरोडा ग्रामपंचायत येथे होते कार्यरत ;मळगाव येथील अपघातातील झाले होते जखमी 

63

 

सावंतवाडी (प्रतिनिधी)

 

ग्रामसेवक ज्ञानेश करंगुटकर यांचा मृत्यु ; तिरोडा ग्रामपंचायत येथे होते कार्यरत ;मळगाव येथील अपघातातील झाले होते जखमी 

 

 

मुंबई गोवा महामार्गाच्या झाराप ते पत्रादेवी बायपासवर मळगाव कुंभार्ली येथे दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात गंभीर जखमी झालेले उभादांडा सुखटणकरवाडी येथील रहिवासी आणि तिरोडा ग्रामपंचायतचे ग्रामसेवक ज्ञानेश अंकुश करंगुटकर (वय ५४) यांचे आज शुक्रवारी पहाटे गोवा बांबुळी येथे उपचारादरम्यान निधन झाले. त्यांच्या निधनामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
ग्रामसेवक ज्ञानेश करंगुटकर हे आपल्या ताब्यातील दुचाकीने ओरोस सिंधुदुर्ग येथून आपले शासकीय कामकाज आटोपून मुंबई गोवा महामार्गाच्या झाराप पत्रादेवी बायपासने मळगावच्या दिशेने वळत होते. त्याचवेळी समोर येणाऱ्या दुचाकीची समोरासमोर धडक बसून हा अपघात झाला होता. अपघातात दोन्ही मोटरसायकल वरील चौघे जण गंभीर जखमी झाले होते. त्यांना गोवा बांबुळी येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.