ग्लोबल फाउंडेशनकडून मडुरा हायस्कूलच्या सहा विद्यार्थ्यांना ज्ञानज्योत शिष्यवृत्ती प्रदान

16

 

बांदा(मंगल कामत)

ग्लोबल फाउंडेशनकडून मडुरा हायस्कूलच्या सहा विद्यार्थ्यांना ज्ञानज्योत शिष्यवृत्ती प्रदान

ग्लोबल फाउंडेशन पिंगुळी, कुडाळ सिंधुदुर्ग ही संस्था गेली वीस वर्षे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ४० पेक्षा जास्त शाळेतील १५० विद्यार्थ्यांना दरवर्षी ज्ञानज्योत शिष्यवृत्ती वितरित करून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कार्यात हातभार लावते. या शैक्षणिक वर्षात न्यू इंग्लिश स्कूल मडुरा प्रशालेतील आदित्य लक्ष्मण जाधव, पूर्वा प्रवीण गावडे, तपस्या भरत धुरी, जानवी संतोष परब, कृषीका राजेश पार्सेकर व यश ज्ञानेश्वर पारवडकर या सहा विद्यार्थ्यांना ज्ञानज्योत शिष्यवृत्तीचे तीन हजार सहाशे रुपये प्रमाणे बँक खात्यामध्ये जमा करण्यात आलेत.
प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ. सायली परब यांनी संस्थेबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी हातभार लावणारी ही संस्था विविध उपक्रम राबवित असते. नेत्र तपासणी, आरोग्य तपासणी, तंत्रज्ञानयुक्त विज्ञाननिष्ठ विद्यार्थी, आदिवासी समाजात जीवनावश्यक वस्तूंचे वाटप, विद्यार्थ्यांना तणाव मुक्त कसे रहावे याचे मार्गदर्शन करते, अशी माहिती देण्यात आली.