कणकवली ( प्रतिनिधी)
शिरवल येथे माघी गणेश जयंती उत्सवा निमित्त १ आणि २ फेब्रुवारी रोजी विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम ; ओम गणेश मित्रमंडळाचे आयोजन
ओम गणेश मित्रमंडळ, शिरवल टेंबवाडी आयोजित शनिवार दि १ फेब्रुवारी व रविवार दि.२ फेब्रुवारी रोजी या कालावधीत माघी गणेश जयंती उत्सव साजरा करण्यात येणार आहे.शिरवल लिंगरवळनाथ मंदिरासमोर माघी गणेश जयंती निमित्त विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
शनिवार दि. १ फेब्रुवारी २०२५ सकाळी ९.०० वा- श्री गणेश मुर्तीचे आगमन, आरती व तीर्थप्रसाद,सकाळी ११.०० वा.श्रीसत्यनारायण महापूजा,दुपारी १.०० ते ३.०० महाप्रसाद,दुपारी ३.०० ते ५.००, स्थानिकांची भजने,हरिपाठ (वारकरी संप्रदाय शिरवल) सायं ७.३० ते ८.३०,रात्री ८.३० ते १०.३० महाप्रसाद, रात्री १०.३० ते ११.३०स्थानिक रेकॉर्ड डान्स स्पर्धा मोरेश्वर पारंपारिक दशावतार नाट्यमंडळ, मोरे यांचे महान काल्पनिक नाटक सैतानी पाश रात्रौ ११.३० वा होणार आहे.





