हरकुळ बुद्रुक जंगमवाडी येथे माघी गणेश जयंती उत्सव

73

 

कणकवली (प्रतिनिधी)

हरकुळ बुद्रुक जंगमवाडी येथे माघी गणेश जयंती उत्सव

हरकुळ बुद्रुक – जंगमवाडी येथील श्री गणेश मंदिरात माघ शु. विनायक चतुर्थी अर्थात ०१ फेब्रुवारी रोजी माघी गणेश जयंती उत्सव विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात येणार आहे.
शुक्रवार ३१ जानेवारी सायं. ०७वा. पासून निमंत्रित भजने, शनिवार १ फेब्रुवारी सकाळी ५.३० वा. काकड आरती, ८.३० वा. श्री गणेश पूजन, दर्शन, ९ वा. अभिषेक, ११ वा. श्री सत्यनारायण महापूजा, १२.३० वा. श्रींची आरती, तीर्थप्रसाद, दुपारी १ ते ३ वा. श्रींची आरती, तीर्थप्रसाद, दुपारी १ ते ३ वा. महाप्रसाद, ३ ते ४ वा. महिलांचे हळदीकुंकू, ४ ते ५ वा. शालेय मुलांच्या स्पर्धा, ७ ते ८ वा. निमंत्रित भजन-मेजारेश्वर प्रा. भजन मंडळ नागवे, ८ ते १० वा. स्थानिक भजने, १० ते १०.३० वा. स्वागत आणि बक्षीस वितरण समारंभ, ११ वा. श्री कलेश्वर दशावतार नाट्यमंडळ यांचे ‘गज-वक्र काय संगम’ हे ट्रिकसीन पौराणिक नाट्यप्रयोग असणार आहे. या उत्सवाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.