कसवण येथील श्री.गणेश मंदिरात माघी गणेश जयंती उत्सवानिमित्त कसवण विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन 

14

 

कणकवली (प्रतिनिधी)
कसवण येथील श्री.गणेश मंदिरात माघी गणेश जयंती उत्सवानिमित्त कसवण विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन 
कणकवली तालुक्यातील कसवण गांवकरवाडी श्री. गणेश मंदिरात ८ वा वर्धापन दिन शुक्रवार ३१ जानेवारी रोजी साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

 

31 जानेवारीला सायंकाळी ३ ते ५ वाजता होम मिनिस्टर, श्री .गणेश मानाची पैठणी ,सायंकाळी ५ ते ७.३० वाजता सुश्राव्य भजनांचा भरगच्च कार्यक्रम, रात्री ७.३० वाजता महाआरती, रात्री ८.३० स्थानिक शुश्राव्य भजनांचा कार्यक्रम, रात्री ९ .३० वाजता दत्त माऊलीचा दशावतार नाट्य मंडळ सिंधुदुर्ग यांचा नाट्य प्रयोग.” शेषात्मज गणेश ” सादर होणार आहे.

 

शनिवार १ फेब्रुवारी रोजी माघी गणेश जयंती उत्सव निमित्त पहाटे ५.३० वाजता “श्री” ची काकड आरती, सकाळी ९ वाजता श्री. सत्यविनायक महापूजा, दुपारी १२ वाजता महाआरती ,दुपारी १ते ३ महाप्रसाद ,दुपारी ३ ते ४ हळदीकुंकू समारंभ ,दुपारी ४ ते ७.३०स्थानिक भजनांचा भरगच्च कार्यक्रम, रात्री ७ . ३० वाजता महाआरती , रात्री ८.३० वाजता महाप्रसाद, रात्री ९वाजता स्थानिक कलाकारांचा कार्यक्रम जल्लोष युवाईचा

 

रविवार दिनांक २ फेब्रुवारी रोजी समराधना व समाप्ती आदी विविध धार्मिक सादर होणार आहेत.

 

तरी सर्व गणेशभक्तांनी उपस्थित राहून सोहळ्याची शोभा वाढवावी असे आवाहन श्री. गणेश कृपा कला, क्रीडा व सांस्कृतिक मंडळ, कसवन गावकरवाडीचे अध्यक्ष श्री.विलास शंकर गावकर यांनी केले आहे.