खेळाडूंनी सकारात्मक दृष्टिकोन ठेवावा-ॲड. अविनाश माणगावकर

75

 

देवगड (प्रतिनीधी)

खेळाडूंनी सकारात्मक दृष्टिकोन ठेवावा-ॲड. अविनाश माणगावकर

देवगड येथील शेठ म.ग .हायस्कूल मध्ये जिल्हास्तरीय शालेय पॉवर लिफ्टिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले होते. त्यावेळी उद्घाटक म्हणून उपस्थित असलेले देवगड एज्युकेशन बोर्ड, मुंबईच्यास्थानीय समितीचे सचिव आणि समन्वय समितीचे अध्यक्ष असलेल्या ॲड. अविनाश माणगावकर यांनी विचार व्यक्त केले.

 

यावेळी व्यासपीठावर कोकण सिंधू पॉवर लिफ्टिंग या संस्थेचे सचिव संजय साटम, सहसचिव गणेश वायंगणकर, खजिनदार प्रदीप नारकर, सदस्य मंगेश घोगले, सदस्या टीना चौगुले, घारे, ओमकार कुबडे, सल्लागार शशांक साटम, शाळेच्या पर्यवेक्षिका निशा दहिबावकर जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाचे रणदिवे, आणि माळी शाळेचे क्रीडा शिक्षक सुरेश पवार आदी मान्यवर उपस्थित होते.

 

क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य, जिल्हा क्रीडा परिषद अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग आणि कोकण सिंधू पॉवरलिफ्टिंग, सिंधुदुर्ग, शेठ म.ग. हायस्कूल,देवगड यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यात पहिल्यांदाच शालेय जिल्हास्तरीय पॉवरलिफ्टिंग क्रीडा स्पर्धेचे आयोजन शाळेच्या गुरुदक्षिणा प्रेक्षागृहात करण्यात आलेले होते.

यावेळी ॲड. अविनाश माणगावकर यांच्या हस्ते दीप प्रज्वलन व फीत कापून स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले.
“खेळाडूंनी सकारात्मक दृष्टिकोन ठेवून आपल्यामध्ये शिस्त ठेवावी. योग्य आहाराचे सेवन करावे. व्यायामाने मनाचा आणि बुद्धीचा देखील विकास होतो आधी मार्गदर्शनपर विचार ॲड. अविनाश माणगावकर यांनी व्यक्त केले.

यावेळी कोकण सिंधू पॉवरलिफ्टिंग संस्थेचे सचिव आणि ओरोस या ठिकाणी पी.एस.आय. व बॉम्बशोधक पथकामध्ये कार्यरत असलेले संजय साटम यांनी संस्थेमार्फत चालू असलेल्या कार्याची माहिती दिली. रणदिवे यांनी देखील आपले मनोगत यावेळी व्यक्त केले.
यावेळी कोकण सिंधू पॉवरलिफ्टिंग संस्थेमार्फत शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन ॲड. अविनाश माणगावकर यांचा सत्कार करण्यात आला.या स्पर्धेमध्ये जिल्ह्यातून जवळपास 50 ते 60 खेळाडूंनी सहभाग नोंदविला. कार्यक्रमाचे निवेदन व आभार सहाय्यक शिक्षक प्रवीण खडपकर यांनी केले.