देवगड येथे 26 जानेवारीला म्युझिकल शोसह रंगणार खेळ पैठणीचा  ; इंद्रधनू देवगडचे आयोजन

30

 

देवगड- प्रतिनिधी

 

देवगड येथे 26 जानेवारीला म्युझिकल शोसह रंगणार खेळ पैठणीचा  ; इंद्रधनू देवगडचे आयोजन

 

विजेत्या महिला स्पर्धकाला मिळणार मानाची पैठणी, उपविजेतीला सोन्याची नथ…

 

खवय्यांसाठी खाऊगल्ली, मुलांसाठी धम्मालमस्ती आणि मनोरंजनात्मक फॅनिगेम्स

 

इंद्रधनू- देवगड’ या संस्थेच्यावतीने प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून २६ जानेवारी रोजी सायंकाळी ४.३० वा. येथील इंद्रप – स्थ हॉल येथे ‘खेळ पैठणीचा, बहुमान देवगडच्या सूनबाईचा’ हा महिलांसाठी विशेष कार्यक्रम ‘म्युझिकल शो’सह आयोजित करण्यात आला आहे. तसेच खवय्यांसाठी ‘खाऊगल्ली’, तर लहान मुलांसाठी मनोरंजन व फनीगेम्सही रंगणार आहेत, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष प्रसाद कुळकर्णी यांनी दिली.

 

 

इंद्रधनू- देवगड या संस्थेच्यावतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षीही प्रजासत्ताक दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. संस्थेच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले. या बैठकीला अध्यक्ष श्री. कुळकर्णी यांच्यासमवेत उपाध्यक्ष किसन सूर्यवंशी, सचिव प्रशांत वाडेकर, खजिनदार तुषार पाळेकर, सहसचिव उदय रुमडे, सदस्य राजीव पडवळ, आनंद रामाणे, दिनेश पटेल, भावेश पटेल, मिलिंद मोर्ये, वैभव केळकर, यतीन कुळकर्णी, प्रशांत पटेल, शंकर मुणगेकर, साईनाथ सुके उपस्थित होते. २६ जानेवारी रोजी सायंकाळी ४.३० वा. इंद्रप्रस्थ हॉल येथे लहान मुलांसाठी मनोरंजनात्मक फनीगेम्स व धम्माल मस्तीचा कार्यक्रम होणार आहेत.
तसेच खवय्यांसाठी खाऊगल्लीचे आयोजनही करण्यात आले आहे. त्यानंतर ‘खेळ पैठणीचा, बहुमान देवगडच्या सूनबाईचा’ हा महिलांसाठी विशेष कार्यक्रम ‘म्युझिकल शो’सह आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम वेंगुर्ले येथील युवा कलाकार तथा निवेदक शुभम धुरी यांच्या संकल्पनेतून रंगणार आहे. यातील विजेत्या महिला स्पर्धकाला मानाची पैठणी देऊन गौरविण्यात येणार आहे. तर उपविजेत्या महिला स्पर्धकाला सोन्याची नथ देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी भावेश पटेल (मोबा. ९४२२८८४३६३) व किसन सूर्यवंशी (मोबा. ९४२३३०३६१३) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.