भारत गॅस ग्राहकांचा ईकेवायशी साठी 9 रोजी आचरा येथे मेळावा

16

 

आचरा (अर्जुन बापर्डेकर)

भारत गॅस ग्राहकांचा ईकेवायशी साठी
9 रोजी आचरा येथे मेळावा

मालवण तालुका सहकारी खरेदी विक्री संघ लि.भारत गॅस एजन्सी मालवण तर्फे
भारत गॅस ग्राहकांना कळविण्यात येते की,मालवण तालुका सहकारी खरेदी विक्री संघ लि.मालवण च्या भारत गॅस एजन्सी मालवण तर्फे गुरूवार दिनांक ०९/०१/२०२५ रोजी सकाळी १०:०० ते सायंकाळी ०५:०० पर्यंत आचरा तिठा येथे भारत गॅस ग्राहकांचा E- KYC नोंदणी कॅम्प आचरा येथे होणार आहे तरी जास्तीत जास्त ग्राहकांनी स्वतः उपस्थित राहून या सेवेचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
सोबत आधार कार्ड ,गॅस बुकिंग कार्ड , रेशनकार्ड कागदपत्रे घेऊन यायची आहेत.बायोमेट्रिक ईकेवायसी असल्यामुळे भारत गॅस ग्राहकांनी स्वतः उपस्थित राहायचे आहे .तसेच रजिस्टर मोबाईल नंबरचा मोबाईल घेऊन येणे अनिवार्य आहे.अधिक माहितीसाठी (02365)252156 : 251156 संपर्क साधण्याचे आवाहन चेअरमन राजन गावकर यांनी केले आहे.