देवगड तालुका सहकारी खरेदी-विक्री संघाच्या वतीने भात खरेदीचा शुभारंभ 

9

 

देवगड (प्रतिनिधी)

देवगड तालुका सहकारी खरेदी-विक्री संघाच्या वतीने भात खरेदीचा शुभारंभ 

 

देवगड तालुका सहकारी खरेदी-विक्री संघ लिमिटेड, देवगड मार्फत शासकीय आधारभूत किंमत धान खरेदी योजना २०२४-२५ अंतर्गत भात खरेदीचा शुभारंभ संघाचे अध्यक्ष अजित पा. गोगटे यांच्या हस्ते झाला. यावेळी संघाचे उपाध्यक्ष रवींद्र तिर्लोटकर, संचालक संतोष किंजवडेकर, प्रविण राणे, अजित राणे, राजेंद्र शेट्ये, संतोष फाटक, चंद्रकांत पाळेकर, व्यवस्थापक कौस्तुभ जामसंडेकर, भात खरेदी प्रमुख राजेश सावंत तसेच शेतकरी बांधव उपस्थित होते.

 

या योजनेअंतर्गत भात खरेदी दर प्रति किलो २३/- रुपये शासनाने जाहीर केला आहे. तालुक्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेत सहभागी व्हावे, असे आवाहन अध्यक्ष अजित गोगटे यांनी केले आहे. भात खरेदीसाठी शेतकऱ्यांनी नोंदणी करण्याची अंतिम तारीख १५ जानेवारी जाहीर केली आहे. अधिक माहितीसाठी शेतकऱ्यांनी कौस्तुभ जामसंडेकर (९४२११४६१०७) यांच्याशी संपर्क साधावा.