कणकवली (प्रतिनिधी)
मत्स्य व बंदर विकास मंत्री नितेश राणे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन
कणकवली बुध्दविहार येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास नवनिर्वाचित मत्स्य व बंदर विकास मंत्री नितेश राणे यांनी पुष्पहार अर्पण करत शनिवारी अभिवादन केले. तद्नंतर बुध्दविहार मधील गौतम बुध्द , डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस वंदन केले.



