Home महाराष्ट्र कणकवली सकारात्मक दृष्टिकोन समोर ठेवून प्रयत्न केल्यास यश हमखास मिळते- कार्यकारी अभियंता श्री.अजयकुमार...

सकारात्मक दृष्टिकोन समोर ठेवून प्रयत्न केल्यास यश हमखास मिळते- कार्यकारी अभियंता श्री.अजयकुमार सर्वगोड

24

 

कणकवली दि २६ डिसेंबर ( प्रतिनिधी)

सकारात्मक दृष्टिकोन समोर ठेवून प्रयत्न केल्यास यश हमखास मिळते- कार्यकारी अभियंता श्री.अजयकुमार सर्वगोड

जीवनात समाजसेवा अन् देशसेवा करणे अत्यंत महत्वाचे आहे

विद्यार्थ्यांनी सकारात्मक दृष्टिकोन समोर ठेवून प्रयत्न केल्यास यश हमखास मिळते.विद्यार्थ्यांनी जिद्द, आत्मविश्वास,कठोर परिश्रमाच्या साथीने प्रगतीचे शिखर गाठावे.नवीन पिढीने आपला सांस्कृतिक वारसा जोपासावा व देशाचे नाव उज्ज्वल करावे.जीवनात समाजसेवा अन् देशसेवा करणे अत्यंत महत्वाचे आहे.असे प्रतिपादन सार्वजनिक बांधकाम विभाग कणकवली चे कार्यकारी अभियंता श्री.अजयकुमार सर्वगोड यांनी केले.

ज्ञानदा शिक्षण संस्थेच्या आयडियल इंग्लिश स्कूल आणि ज्युनियर कॉलेज वरवडे या प्रशालेच्या वार्षिक पारितोषिक वितरण समारंभात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.यावेळी व्यासपीठावर श्री. सुरेश सावंत माजी पंचायत समिती कणकवली, ज्ञानदा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ विद्याधर तायशेटे,उपाध्यक्ष श्री. मोहन सावंत , कार्याध्यक्ष श्री. बुलंद पटेल , संस्थापक सचिव प्राध्यापक हरिभाऊ भिसे , प्राध्यापक श्री. निलेश महेंद्रकर , सल्लागार श्री.डी.पी तानावडे , मुख्याध्यापिका सौ. अर्चना शेखर देसाई, श्री. वळंजु , पी. टी. ए. मेंबर सौ. चराटे , सौ. कुडाळकर , शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी अजयकुमार सर्वगोड मार्गदर्शन करताना म्हणाले की,विद्यार्थ्यांना सद्य परिस्थितीमध्ये संस्काराची शिदोरी फार महत्त्वाची असून विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांच्या कष्टाची जाणीव ठेवावी तसेच उपलब्ध करुन दिलेल्या व्यासपीठाचा व संधीचा योग्य वापर करून आपला उत्कर्ष साधावा असा मोलाचा संदेश दिला.परमेश्वरानं दिलेलं जीवन हे कशासाठी आहे ? याचा अर्थ मोजक्याच लोकांना समजला आहे.ज्ञानापेक्षा चारित्र्य श्रेष्ठ, चारित्र्य संपन्न जीवन जगा.असेही सर्वगोड यांनी सांगितले.

या जीवनाचा उपयोग समाजासाठी करत संस्कारक्षम कार्य करणाऱ्या लोकांना पुढे आणण्याचे काम ज्ञानदा शिक्षण संस्था करत आहे.संस्थेचे हे कार्य कौतुकास्पद आहे‌. .संस्कृती, संस्कार यांचा विचार आज होत नाही आहे. अशावेळी समाज जागृत रहावा यासाठी काम करणाऱ्या मंडळींची गरज असते. अशाच व्यक्तीमत्वांचा सन्मान याठिकाणी झाला. ज्ञानदा शिक्षण सारख्या संस्थेने समाजासाठी संस्कारक्षम कार्य केलं असून समाजासाठी काम करणाऱ्या लोकांना पुढे आणण्याचे काम ज्ञानदा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ विद्याधर तायशेटे‌ आणि हि संस्था करीत आहे.असे गौरवोद्गार सर्वगोड यांनी काढले.

कार्यकारी अभियंता श्री.अजयकुमार सर्वगोड यांच्या शुभहस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन संपन्न झाले. त्याचप्रमाणे कणकवली पंचायत समितीचे माजी सभापती श्री. सुरेश सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला. स्कॉलरशिप, एम.टी. एस. अशा स्पर्धा परीक्षांमध्ये तसेच बुद्धीबळ तायक्वांदो, योगा, वक्तृत्व , प्रश्नमंजुषा, चित्रकला अशा विविध स्पर्धांमध्ये जिल्ह्यात व राज्यस्तरावर यश प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले. प्रशालेमध्ये झालेल्या वार्षिक क्रीडा महोत्सवातील वैयक्तिक व सांघिक खेळातील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आले.या कार्यक्रमाच्या निमित्ताने ” साने गुरुजी कथानमाला” यांच्या वतीने दरवर्षी मोठ्या प्रमाणात “श्यामची आई” या पुस्तकावर घेतल्या जाणाऱ्या परीक्षेत प्रशालेचे विद्यार्थी भरघोस यश संपादन करतात याचेच फलित म्हणून “सानेगुरुजी कथानमाला ” यांच्या वतीने आयडियलच्या मुख्याध्यापिका सौ. अर्चना शेखर देसाई आणि प्रशालेच्या शिक्षिका सौ. श्वेता गावडे म यांच्या मानसन्मान करण्यात आला. यानिमित्ताने प्रशालेतील मुलांच्या कला गुणांना वाव देण्यासाठी चित्रांचे प्रदर्शन (आर्ट गॅलरी) भरविण्यात आली होती त्याचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते पार पडले. या यामधील यशस्वी विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले.

या कार्यक्रमांतर्गत संध्याकाळी पालकांसाठी “आयडियल पेरेंट्स उत्सव “संपन्न झाल्या यामध्ये पालकांनी नृत्य, फॅन्सी ड्रेस, आणि गायन स्पर्धेत सहभाग घेतला होता या स्पर्धेतील द्वितीय आणि तृतीय विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. हेमंत पाटकर आणि सौ. शीतल बांदल यांनी केले.