Home महाराष्ट्र कणकवली सिंधुदुर्ग जिल्हा वारकरी संप्रदाय, सिंधुदुर्गचा संतसेवा पुरस्कार २०२४ जाहीर ; ह.भ.प. रमाकांत...

सिंधुदुर्ग जिल्हा वारकरी संप्रदाय, सिंधुदुर्गचा संतसेवा पुरस्कार २०२४ जाहीर ; ह.भ.प. रमाकांत गायकवाड (फोंडा-कणकवली) आणि ह.भ.प.तायाराम रामचंद्र गुरव (नर्ले वैभववाडी हे यावर्षीचे मानकरी

31

 

कणकवली दि २८( प्रतिनिधी)

सिंधुदुर्ग जिल्हा वारकरी संप्रदाय, सिंधुदुर्गचा संतसेवा पुरस्कार २०२४ जाहीर ; ह.भ.प. रमाकांत गायकवाड (फोंडा-कणकवली) आणि ह.भ.प.तायाराम रामचंद्र गुरव (नर्ले वैभववाडी हे यावर्षीचे मानकरी

वसंतराव आचरेकर प्रतिष्ठान सभागृहात होणार मेळावा 
सिंधुदुर्ग जिल्हा वारकरी संप्रदाय, सिंधुदुर्गचे मानाचे संतसेवा पुरस्कार २०२४ नुकतेच जाहीर करण्यात आले. यावर्षी ह.भ.प. रमाकांत गायकवाड (फोंडाघाट कणकवली) व तायाराम रामचंद्र गुरव (नर्ले वैभववाडी)यांना जाहीर करण्यात आले.वारकरी संप्रदायात हा पुरस्कार अत्यंत महत्त्वाचे व मानाचे समजले जातात. गेली ११ वर्षे सातत्याने हे पुरस्कार जिल्ह्यातील जेष्ठ कीर्तनकार, मृदंगमनी, प्रवचनकार यांना देण्यात येत आहे.
रविवार दिनांक २९ डिसेंबर २०२४ रोजी होणाऱ्या वारकरी जिल्हा मेळाव्यात हे मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहेत.सिंधुदुर्ग जिल्हा वारकरी संप्रदाय, सिंधुदुर्ग च्या पुरस्कार समितीच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत हे पुरस्कार जाहीर करण्यात आले. या बैठकीस जिल्हा अध्यक्ष ह.भ.प. विश्वनाथ गवंडळकर,खजिनदार मधुकर प्रभुगावकर, सचिव राजू राणे, गणपत घाडीगांवकर, प्रकाश सावंत, कार्याध्यक्ष रामचंद्र कदम, संतोष राऊळ हे उपस्थित होते.

 

रविवार दिनांक २९ डिसेंबर २०२४ रोजी जिल्हा अध्यक्ष ह.भ.प. विश्वनाथ गवंडळकर, यांच्या अध्यक्षतेखाली वसंतराव आचरेकर प्रतिष्ठान सभागृह कणकवली येथे होणाऱ्या वारकरी जिल्हा मेळाव्यास जिल्ह्यातील विठ्ठल भक्त, भाविक, तसेच वारकरी बंधु-भगिनी यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे व यानिमित्ताने काढण्यात येणाऱ्या वारकरी दिंडीसही मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा सचिव राजू राणे यांनी केले आहे.