दीक्षित फाउंडेशन शैक्षणिक विचार मंच व अ.कृ.केळकर हायस्कूल वाडा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या तालुकास्तरीय खो.खो. स्पर्धेत जामसंडे गोगटे प्रशालेचे यश
दीक्षित फाउंडेशन शैक्षणिक विचार मंच व अ.कृ.केळकर हायस्कूल वाडा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या तालुकास्तरीय खो.खो. स्पर्धेत जामसंडे गोगटे प्रशालेचे यश
स्व.निळकंठ श्रीधर तथा बाळासाहेब दीक्षित व स्व.निता निळकंठ दीक्षित यांचे स्मरणार्थ दीक्षित फाउंडेशन शैक्षणिक विचार मंच व अ.कृ.केळकर हायस्कूल वाडा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या तालुकास्तरीय खो.खो. स्पर्धेत जामसंडे येथील श्रीराम मोरेश्वर गोगटे प्रशालेच्या मुलांच्या संघाने प्रथम क्रमांकाचे सन्मानचिन्हासह २५००/.रुपयाचे पारितोषिक पटकावले आहे.
तर मुलींच्या संघाने तृतीय क्रमांकाचे सन्मानचिन्हासह १५००/.रुपयाचे पारितोषिक पटकावले आहे.
यशस्वी विद्यार्थ्यांना क्रीडाशिक्षक श्री.मृत्युंजय मुणगेकर व श्री.पराग हिरणाईक यांचे मार्गदर्शन लाभले.
यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे संस्थाध्यक्ष माजी आमदार ॲड.अजीत गोगटे , सचिव-प्रवीण जोग ,शाळा समिती अध्यक्ष-प्रसाद मोंडकर व मुख्याध्यापक श्री.सुनील जाधव यांनी अभिनंदन केले आहे.