खांबाळेत ११ डिसेंबरला आदिष्टी देवीचा जत्रौत्सव

19

 

वैभववाडी (तुषार शिंगाडे)

 

खांबाळेत ११ डिसेंबरला आदिष्टी देवीचा जत्रौत्सव

खांबाळे श्री देवीआदिष्टीचा सप्ताह तथा जत्रोत्सव ११ डिसेंबरला होत आहे. यानिमित्त राज्यातील भजनक्षेत्रातील दिग्गज भजनीबुवांचा “भजन महोत्सव” आयोजित करण्यात आला आहे. खांबाळे येथील श्री देवी आदिष्टीचा सप्ताह तथा जत्रौस्तव ११ डिसेंबरला होणार आहे.

याची जोरदार तयारी सध्या सुरू आहे. जत्रौत्सवानिमित्त भजन क्षेत्रातील दिग्गज भजनीबुवांचा भजन महोत्सव आयोजित केला आहे. या महोत्सवाकरिता भजन महर्षी बुवा विजय परब-देवगड, भजन सम्राट बुवा भगवान लोकरे, मुंबई, लोकप्रिय गायक बुवा उमेश सुतार (मुंबई), नामवंत बुवा प्रमोद हरियाण (मुंबई), बुवा संतोष शिर्सेकर रत्नागिरी, बुवा अजित मुळम, देवगड या बुवांना निमंत्रिंत करण्यात आले आहे. पहाटे १० वाजल्यापासून कार्यक्रमांना सुरुवात होणार आहे. सकाळी १० वाजता घटस्थापना, सकाळी १० ते सांयकाळी ६ स्थानिक भजने, ६ वाजता भजन महोत्सवाला प्रारंभ, रात्री ११ वाजता पालखी सोहळा, रात्री १२ ते ३ भजन महोत्सव त्यानंतर १२ डिसेंबर सकाळी ८ वाजेपर्यंत स्थानिक भजने, ९ वाजता. अभिषेक, दुपारी एक वाजता महाप्रसाद अशी कार्यक्रमांची रूपरेषा आहे.

दरम्यान जत्रौत्सवाची जय्यत तयारी सुरू असून गावातील सर्व ग्रामस्थ रात्रंदिवस जत्रोत्सवाची पूर्वतयारी करीत आहेत. या जत्रौत्सवाकरिता मोठ्या प्रमाणात चाकरमानी येतात. सर्व भाविकांनी उपस्थित राहावे. असे आवाहन श्री देवी आदिष्टी देवस्थान उपसमितीच्या वतीने करण्यात आले आहे.