कणकवली दि ११ डिसेंबर (प्रतिनिधी)
गोवा येथील राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेसाठी महाराष्ट्रातुन तायक्वांदो राष्ट्रीय पंच व प्रशिक्षक एकनाथ धनवटे व अक्षय कुलकर्णी यांची निवड
गोवा येथे होणाऱ्या चौथ्या राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेसाठी महाराष्ट्रातून सिंधुदुर्ग जिल्यातील तायक्वांदो राष्ट्रीय पंच व प्रशिक्षक एकनाथ धनवटे व अक्षय कुलकर्णी यांची निवड करण्यात आली आहे.
तायक्वांदो फेडरेशन ऑफ इंडिया च्या मार्गदर्शनाखाली गोवा तायक्वांदो असोसिएशन च्या सहकार्याने तायक्वांदो अकॅडमी ऑफ वास्को आयोजित ही स्पर्धा पेडम स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स इंडोअर स्टेडियम पेडम, म्हापसा गोवा येथे तीन दिवस होणार आहेत.
13 ते 15 डिसेंबर या तीन दिवसात होणाऱ्या या खुल्या राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेसाठी देशाच्या विविध राज्यातून पंच निवडीतून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली मधून एकनाथ धनवटे व अक्षय कुलकर्णी यांची निवड करण्यात आली आहे.





