पणदेवगड (प्रतिनिधी)
जामसंडे येथील रक्तदान शिबिरात ८१ जणांनी केले रक्तदान
युवा विकास प्रतिष्ठान जामसंडे व सिंधुरत्न मित्र प्रतिष्ठान देवगड शाखा याच्या विद्यमाने ओरस रक्तपेढी यांच्या वतीने जामसंडे येथे रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.या शिबीरात ८१ रक्तदात्यांनी प्रत्यक्ष रक्तदान केले.
या शिबीराचे उद्घाटन, या डॉक्टर दत्तप्रसाद सावंत याच्या हस्ते करण्यात आले. यावेळी युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष अंकुश लाड, सुधीर तांबे, रक्तमित्र प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष प्रविण जोग, प्रकाश जाधव (सचिव) उध्दव गोरे, भावेश पटेल,महेश शिरोडकर अनुप बापट, नंदन घाटे,बाळा घाडी, आदि मान्यवर उपस्थित होते.
या शिबिरास डॉ. सुनिल आठवले यांनी भेट दिली.डॉ. अखिलेश घारे यांनी स्वतः रक्तदान केले.रवीना बाबू पवार ,मंजिरी सुजित बोंडाळे, संपदा संजय राणे या महिलांनी देखील शिबिरात सहभाग घेत रक्तदान केले. ओरस ब्लड बँक टिम-डाॅ. संकेत रोटे नंदकुमार आडकर, प्रांजली परब, नैना परब, मयुरी शिंदे, कांचन परब नितीन गावकर ही जिल्हा रक्तपेढीचे कर्मचारी यावेळी उपस्थित होते .या सर्व रक्तदात्यांचे व जिल्हा रक्त पतपेढीचे आयोजकांनी आभार व्यक्त केले.





