वैभववाडी परिसरात बंद घरफोडीचे चोरीसत्र सुरूचं ; पोलिसांनी गस्त वाढवावी नागरिकातून होते मागणी

64

वैभववाडी प्रतिनिधी

 

वैभववाडी परिसरात बंद घरफोडीचे चोरीसत्र सुरूचं ; पोलिसांनी गस्त वाढवावी नागरिकातून होते मागणी

 

 

वैभववाडी शहरात चोरीचे सत्र सुरूच असून शनिवारी रात्री शहरातील वार्ड नंबर १२वार्ड नंबर १३ मधील दोन बंद घरे फोडली. घरमालक मुंबई असल्याने चोरीची तक्रार द्यायला कोणी पुढे येत नसल्याने चोर मात्र मोकाट फिरत आहेत. अशी चर्चा वैभववाडी शहरात ठिकठिकाणी सकाळपासून सुरू होती.

उपलध माहिती नुसार, वैभववाडी शहरात गेली पंधरा दिवस अधून मधून बंद घरे फोडून चोरून चोरी करण्याची सत्र सुरूच आहे.जी घरे बंद आहेत घर मालक किंवा भाडोत्री मुंबईला गेलेले पाहून हे चोर रात्री दरवाजाच्या कड्या एक्सोब्रेडने कापून घरात घुसून चोरी करत आहेत. शनिवारी रात्री वाभवे नगरपंचायतीच्या हद्दीतील वार्ड नंबर १२ मधील घर मालक मुंबईला व तेथील भाडोत्रीही शनिवारी संध्याकाळी पाच वाजता घर बंद करून मुंबईला निघून गेले याचा चोराने फायदा घेऊन रात्री समोरच्या दरवाज्याची कढी एक्सोब्लेडने कापून व बाजूच्या रूमला बाहेरून कडी घालून चोराने बंद घरामध्ये प्रवेश केला व सगळं साहित्य अस्ताव्यस्त करून टाकले आहे त्या भाडोत्री मालकाशी दूरध्वनीवरून संपर्क केला असता आमच्या घरात नेण्यासारखं काही नव्हतं तरी पण आम्ही आल्यानंतर बघतो असे सांगितले.

तर वॉर्ड नंबर १३ मध्ये घर मालक मालक वरच्या मजल्यावर राहत होते तर चोरांनी त्यांच्या खालील बंद खोली फोडून आत मध्ये प्रवेश केला पण त्यांना काही सापडले नाही घरातील साहित्य मात्र विस्कटून टाकले अशी चर्चा आहे.पंधरा दिवसांपूर्वी वार्ड नंबर १२ मध्ये असंच घर मालक मुंबईला गेले असल्याचे फायदा घेत चोरट्याने खिडकी फोडून खिडकीची ग्रील कापून आत प्रवेश केला व साहित्य विस्कटून करून टाकले होते मात्र घरमालक मुंबईवरून गावी आल्यानंतर त्यांनी पाहिले असता त्यांची कोणत्याही गोष्ट चोरीला गेलेली नाही असे समजून त्यांनी वैभववाडी पोलीस स्थानकात तक्रार दिलेली नाही.
वैभववाडी दत्त मंदिर ते वॉर्ड नंबर १२ वार्ड नंबर १३ अशी रात्री पोलिसांची गस्त वाढवली तर अशा रात्री होणाऱ्या चोरीवर आळा बसू शकतो असे नागरिकांमधून बोलले जात आहे.