देवगड (प्रतिनिधी)
फणसे खाडीत कालवे काढण्यासाठी गेलेल्या ५६ वर्षीय इसमाचा मृत्यू
फणसे खाडीपात्रात कालवे काढण्यासाठी गेलेल्या जयसिंग सहदेव गावकर (५६) याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.ही घटना १९ नोव्हेंबर रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,
देवगड तालुक्यातील फणसे येथील जयसिंग सहदेव गावकर (५६ रा फणसे) हे फणसेकर खाजणा समोरील खाडीपात्रात कालवे काढण्यासाठी गेले होते.पाण्याचा अंदाज न आल्याने त्याचा बुडून मृत्यू झाला.याबाबतची खबर त्यांचे भाऊ दिनेश गावकर यांनी देवगड पोलिसात दिली असून या घटनेचा अधिक तपास देवगड पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार विजय बिर्जे करत आहेत.





