किंजवडे गावच्या विकासासाठी आपण कटिबद्ध आमदार नितेश राणे
देवगड (प्रतिनिधी)
भाजपप्रणित महायुती सरकारच्या माध्यमातून राबविण्यात आलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेसह विविध शासकीय योजना किंजवडे गावात प्रभावीपणे राबविण्यात आल्या आहेत. या गावातील मंदिरांच्या सुशोभिकरणासह विविध विकासकामांसाठी कोट्यवधीचा निधी आपण देऊ केला आहे. किंजवडे गावाच्या विकासासाठी आपण कटिबद्ध असल्याचे आश्वासन आमदार नीतेश राणे यांनी दिले.






