देवगड (प्रतिनिधी)
भाजप उमेदवार आमदार नितेश राणे यांची प्रचारात आघाडी ; सोशल मीडिया, गाव भेट कार्यक्रम यावर दिलाय भर
आमदार नितेश राणे यांच्या सह असंख्य भाजपा पदाधिकारी झालेत प्रचारात सक्रिय
लोकसभा निवडणूक २० नोव्हेंबर रोजी होत असून या निवडणुकीसाठी कणकवली देवगड वैभववाडी विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार आमदार नितेश राणे यांनी प्रचारात आघाडी घेतलेली दिसत असून दिवस रात्र गाव भेटी कार्यक्रम यावर भर दिला जात आहे तसेच सोशल मीडियात देखील मोठ्या प्रमाणात नितेश राणेंची क्रेझ दिसत आहे.
भारतीय जनता पार्टी महिला मंडल देवगडच्या वतीने भाजपचे उमेदवार आमदार नितेश राणे यांच्या प्रचारार्थ महिला मोर्चा देवगड अध्यक्षा उष:कला केळुसकर भाजपा महिला मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष सावी लोके, भाजप देवगड मंडळ महिला उपाध्यक्ष श्वेता शिवलकर ,देवगड जामसंडे शहर अध्यक्षा तन्वी शिंदे शक्ती केंद्र प्रमुख प्राजक्ता घाडी , सरपंच आणि महिला कार्यकर्ते विभाग स्तरावर महिलांच्या गाव भेटी घेताना दिसत आहेत आमदार नितेश राणे यांनी केलेल्या दहा वर्षातील कामाचा लेखाजोगा त्याच बरोबर केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांचे महत्व या गाव कार्यक्रमाच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेला पटवून देताना दिसत आहेत.
तर दुसरीकडे आमदार नितेश राणे स्वतः देखील मतदारसंघात गाव भेट कार्यक्रमावर भर दिला असून गाव कार्यक्रमाचा झंझावत आमदार नितेश राणे यांनी सुरू केलेल्या दिसत आहेत. शिवसेना भाजप उमेदवार आमदार नितेश राणे, माजी आमदार अजित गोगटे, जिल्हा सरचिटणीस संदीप साटम, बाळासाहेब खडपे, भाजपा युवा मोर्चा शहर अध्यक्ष दयानंद पाटील , भाजप शहर अध्यक्ष योगेश पाटकर, नगरपंचायत गटनेता शरद ठुकरुल त्यांच्यासह असंख्य कार्यकर्ते या गावभेट कार्यक्रमांवर भर देताना दिसत आहे. महायुतीचे उमेदवार आमदार नितेश राणे यांनी प्रचारात आघाडी घेतली असून सोमवार २८ तारीखला ते आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.





