माजगाव येथे एसटी बस व ट्रकमध्ये अपघात ; एसटी चालक, वाहकासह २४ प्रवाशांना गंभीर दुखापत

13

 

बांदा (प्रतिनिधी)

 

माजगाव येथे एसटी बस व ट्रकमध्ये अपघात ; एसटी चालक, वाहकासह २४ प्रवाशांना गंभीर दुखापत

माजगाव येथे आज सायंकाळी चार वाजण्याच्या दरम्यान पणजी-सावंतवाडी एसटी बस व छत्तीसगड येथील ट्रकमध्ये अपघात झाला. दोन्ही गाड्यांच्या दर्शनी भागांच यात नुकसान झाले. अपघातात एसटीतील चालक, वाहक यांच्यासह २४ प्रवाशांना गंभीर दुखापत झाली‌. तर ट्रकचालक केबीनमध्ये अडकून पडला होता‌. ट्रक चालक व क्लिनर यांना गंभीर दुखापत झाली असून अधिक उपचारासाठी गोवा बांबोळी येथे हलविण्यात आले आहे.
या अपघातात एसटी चालक प्रविण आचरेकर, वाहक राणे यांच्यासह २४ प्रवाशांना गंभीर दुखापत झाली‌. नाका तोंडाला मार बसल्याने रक्तस्राव झाला. जखमींना तातडीने उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. याठिकाणी त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले. या अपघाताची भीषणता एवढी मोठी होती की ट्रक चालक केबीनमध्ये अडकून पडला. त्याला गंभीर दुखापत झाली असून गोवा बांबोळी येथे अधिक उपचारासाठी हलविण्यात आले. आशिष सावंत, बाबू शिंदे अशी त्यांची नावे आहेत.तसेच सोबतच्या क्लिनरला गोवा येथे हलविले. अडकलेल्या ट्रक चालकाला बाहेर काढण्यासाठी तसेच अपघातग्रस्तांना मदतीसाठी सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे सदस्य, माजगाव, इन्सुली, चराठा, बांदा, सावंतवाडी येथील सामाजिक कार्यकर्ते, युवक, ग्रामस्थांनी धाव घेतली. यामुळे बचावकार्याला गती मिळाली. सावंतवाडी आगराचे प्रांजल धुरी, रेश्मा सावंत, केके यादव आदींनी जखमी प्रवाशांचा महामंडळातर्फे मिळणाऱ्या आर्थिक मदतीबाबचता अर्ज भरून घेतला. जखमींवर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.