देवगड इंद्रधनु आयोजित खुल्या दांडिया ग्रुप स्पर्धेत संघर्ष दांडिया ग्रुप रत्नागिरी प्रथम

30

 

देवगड/ प्रतिनिधी

 

देवगड इंद्रधनु आयोजित खुल्या दांडिया ग्रुप स्पर्धेत संघर्ष दांडिया ग्रुप रत्नागिरी प्रथम

 

इंद्रधनू, देवगड आयोजित व आमदार नीतेश राणे पुरस्कृत नवरात्र उत्सवानिमित्त आयोजित खुल्या ग्रुप दांडिया स्पर्धेत संघर्ष दांडिया ग्रुपने प्रथम क्रमांक मिळविला. तसेच फॅन्सी ड्रेस स्पर्धेत मोठ्या गटात हार्दिक कुबल तर लहान गटात स्वरा भिडे हिने प्रथम क्रमांक मिळविला.

 

खुल्या ग्रुप दांडिया स्पर्धेत प्रथम क्रमांक संघर्ष दांडिया ग्रुप, रत्नागिरी, द्वितीय क्रमांक उत्कर्ष दांडिया ग्रुप, दाभोसवाडा वेंगुर्ला व तृतीय क्रमांक श्री पावणाईदेवी दांडिया ग्रुप, कुणकेश्वर यांनी पटकावला. प्रोत्साहनपर पारितोषिक अल्फान्सो दांडिया ग्रुप देवगड संघाला देण्यात आले.
फॅन्सी ड्रेस स्पर्धेमध्ये लहान गटात प्रथम क्रमांक स्वरा भिडे, द्वितीय क्रमांक श्रावणी आरोंडेकर, तृतीय क्रमांक श्रेयान किनळेकर, उतेजनार्थ आर्यन लाड, क्रीश वायंगणकर तर खुल्या गटात प्रथम क्रमांक हार्दिक कुबल, द्वितीय क्रमांक दिपराज मेस्त्री, तृतीय क्रमांक संज्योत रुमडे, उतेजनार्थ महेश जोशी, देवेन्द्र घाटे यांनी पटकावले.

दांडिया स्पधेसाठी परीक्षक म्हणून सौ. प्रिया लाड बांधकर व हार्दिक शेगले, फॅन्सी ड्रेस स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून अक्षय मेस्त्री व दुर्वास सावंत यांनी काम पाहिले.