कणकवली (तुळशीदास कुडतरकर)
संवाद परिवार तळेरेच्या वतीने खास कोजागिरी पौर्णिमे निमित्ताने गोवा येथील सुप्रसिध्द गायक तसेच प्रती किशोर कुमार यांचा बहारदार संगीत कार्यक्रम
तळेरे येथील संवाद परिवाराच्या वतीने आयोजन
संवाद परिवार तळेरेच्या वतीने खास कोजागिरी पौर्णिमेचे औचित्य साधून गोवा येथील सुप्रसिध्द गायक तसेच प्रती किशोर कुमार म्हणून ज्यांची वेगळी ओळख असलेले श्री.क्वचित शानभाग यांचा “यादे किशोर कुमार की…!” हा किशोर कुमार यांच्याच हुबेहूब आवाजातील सदाबहार संगीत मैफिलीचा कार्यक्रम बुधवार दिनांक १६ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ७.०० ते रात्री ९.०० वाजता या वेळेत तळेरे येथील वामनराव महाडिक विद्यालयाच्या डॉ.एम्.डी.देसाई सांस्कृतिक भवनात आयोजित करण्यात आला आहे. संगीत प्रेमींसाठी यादगार संगीत पर्वणीच म्हणावी लागेल.
कोजागरी पौर्णिमेच्या चांदण्या रात्री एक सुरेल मैफिल दरवर्षी संवाद परिवाराच्या वतीने रंगवली जाते. मागील वर्षी मधु कट्टया वरती काव्य मैफिल आयोजित करण्यात आली होती. तर यावर्षी जेष्ठ गायक कै.किशोर कुमार यांच्या गाण्यांची मैफिल आयोजित करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. किशोर कुमार यांची सर्व गाणी हुबेहूब त्यांच्याच आवाजात गाण्यासाठी प्रख्यात असलेले ज्यांना प्रती किशोर कुमार म्हटले जाते ते श्री.क्वचित शानभाग यांचा गाण्यांचा कार्यक्रम वामनराव महाडिक विद्यालयाच्या डॉ.एम्.डी.देसाई सांस्कृतिक भवनात आयोजित करण्यात आलेला आहे. तसेच यावेळी कोल्हापूर येथील श्री.सुधर्म वाझे हे ही आपली कला अदाकारी सादर करणार आहेत.
तरी या कार्यक्रम प्रसंगी रसिक प्रेक्षकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कोजागिरी पौर्णिमेची चांदणी रात्र अधिक यादगार करुयात असे आवाहन संवाद परिवाराचे संस्थापक डॉ.मिलिंद कुलकर्णी यांनी केले आहे.





