पंचायत समिती देवगड येथे शिव स्वराज्य दिन साजरा

80

पंचायत समिती देवगड येथे शिव स्वराज्य दिन साजरा

देवगड (प्रतिनिधी) ६ जून २०२४

      पंचायत समिती देवगड येथे ६ जुन शिवराज्याभिषेक सोहळा दिनानिमित्त शिवस्वराज्य गुढी उभारून शिवस्वराज्य दिन गटविकास अधिकारी देवगड वृक्षाली  यादव यांच्या मार्गदर्शनाखालील संपन्न झाला .               यावेळी सदर कार्यक्रमात राज्यगीत व राष्ट्रगीत सादर करण्यात आले  तसेच शिवराज्यभिषेक महती सांगण्यात आली .

       यावेळी सहाय्यक गटविकास अधिकारी मुकेश सजगाने ,कार्यकारी अभियंता उदयकुमार महाजनी , शाखा अभियंता बांधकाम अनिल तांबे ,कक्ष अधिकारी संतोष बिर्जे , लेखाधिकारी रमेश उपलवार , विस्तार अधिकारी निलेश जगताप , विस्तार अधिकारी अंकुश जंगले , विस्तार अधिकारी आरोग्य प्रतिमा वळंजु, मुख्यसेविका पुजा सावंत , मुख्यसेविका राखी राणे आदी अधिकारी ,कर्मचारी  उपस्थित होते .